Join us

लातूर विभागाच्या मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपआयुक्तांनी दिली कृषि विज्ञान केंद्र तोंडापूर येथे भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 10:49 AM

भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे श्री. शिरीष गाताडे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग यांनी बुधवार (दि.२४) भेट दिली.

भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे श्री. शिरीष गाताडे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग यांनी बुधवार (दि.२४) भेट दिली.

या भेटी दरम्यान प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग गिरीश गाताडे यांनी मनरेगा योजना, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्य पाककृती ज्यामध्ये वडे, पापड, लोणचे व जवळा चटणी, मत्स्य खाद्य प्रकल्प, शोभिवंत मासे उद्योग, मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ, माशांचे खाद्य विषयी माहिती दिली.

तर कृषि विज्ञान केंद्र तोंडापुरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या विवीध उपक्रमामुळे  निश्चितच भविष्यात हिंगोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय वाढीस चालना मिळेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी मत्स्य व्यवसाय युनिटचे सादरीकरण केले व कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्रावर असलेल्या विविध युनिटची माहिती दिली.

यावेळी हिंगोलीचे मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त श्रवण व्यवहारे, सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सतीश कराळे, उद्यान विद्या विषय विशेषज्ञ अनिल ओळंबे, पिक संरक्षण विषय विशेषज्ञ अजय कुमार सुगावे , गृह विज्ञान विषय विशेषज्ञ रोहिणी शिंदे, कृषि विस्तार विषय विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई, मृदा विज्ञान विषय विशेषज्ञ साईनाथ खरात, कार्यक्रम सहाय्यक पशु विज्ञान डॉ. कैलास गीते, शिवलिंग लिंगे, मनीषा मुंगल, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हानवते, प्रेमदास जाधव, राघोजी नरवाडे आदींसह अनेक जन उपस्थित होते.

हेही वाचा - ज्वारीचे उपपदार्थ करून मिळवा अधिकचा नफा; ज्वारीचे मूल्यवर्धन व पोषणमूल्य

टॅग्स :शेती क्षेत्रहिंगोलीलातूरसरकारमराठवाडाशेतकरी