अकोला : या वर्षात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सहा नवे वाण, तीन यंत्र व ७३ शेती तंत्रज्ञानाच्या शिफारशी देशाला दिल्या आहेत. कृषी विद्यापीठाचेagriculture university करडई, मोहरी, हरभरा वाण शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहेत. हवामान weather बदलाच्याchanges परिस्थितीत सर्वसाधारण शेतकरी कुटुंबाला शाश्वत करणारे एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प केंद्र लोकप्रिय ठरत आहे.
अत्यल्प दूध उत्पादक गोवंशांच्या शेणापासून गांडूळ खतनिर्मिती साधत आर्थिक साहाय्य करणारा पीडीकेवी अर्थ गोल्डनिर्मिती प्रकल्प शेतीपूरक व्यवसायांचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.
देशी गोवंश संवर्धन आणि वृद्धीकरणअंतर्गत उपलब्ध गावरान गोवंशापासून साहिवाल गोवंश निर्मितीसाठी अत्याधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि सोर्टेड सीमेन तंत्रज्ञानासह मोकळ्या पद्धतीच्या गोठ्याचा पुरस्कार करण्यात आला.
ज्वारी पिकाखालील क्षेत्र वाढ कार्यक्रमाअंतर्गत वाशिम येथील प्रक्षेत्रावर ज्वारीच्या २६ हजारांहूनही अधिक जर्मप्लाझमची तपासणी करण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सन्मानित करण्यात आले व त्यांचा कार्य परिचय इतर महिलांना प्रेरक ठरला. खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे माध्यमातून शेतकरी बंधूंना मार्गदर्शनासह बियाणांची उपलब्धता करून देण्यात आले.
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करत राज्य तथा केंद्र शासनाद्वारे पुरस्कृत शेतकरी बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला.
विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधत यावर्षी विद्यापीठ निर्मिती पीक वाण तथा तंत्रज्ञान शेतकरी बंधूंना 'याचि देही, याचि डोळा' प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. जिवंत पीक प्रात्यक्षिके हा केंद्रबिंदू ठरला.
ॲग्रोटेक
'हॉर्टिकल्चर डे'च्या माध्यमातून फळपिके, भाजीपाला पिके तथा फूल पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेकच्या माध्यमातून कृषी आणि संलग्नित तंत्रज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी विद्यापीठाद्वारे प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक जिल्हात कृषी निविष्ठा केंद्र
विद्यापीठनिर्मित कृषी निविष्ठा शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांना सहजतेने उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा विक्री केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
गाव दत्तक घेतले!
विद्यापीठाच्या आदर्श गाव योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात विदर्भातील ११ ही जिल्ह्यांमधून विकासापासून वंचित दुर्गम भागातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेण्यात आले असून, तीन वर्षात या गावाची अर्थव्यवस्था बदलण्याची उद्दिष्ट साध्य होत आहे. याअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तरावरील गावांची निवड करत क्रमाने संपूर्ण विदर्भ आदर्श करण्याचा विद्यापीठाचा संकल्प आहे.