Join us

Floriculture : फुलांच्या नवीन संशोधनाला आला बहर; देणार भरघोस उत्पादन वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:53 IST

Floriculture : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी आता फुलशेतीकडे (Floriculture) वळत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अधिक उत्पादनक्षम आणि बाजारपेठेत (Market) मागणी असलेल्या सहा नवीन फुलांच्या जाती विकसित केल्या आहेत वाचा सविस्तर.

अकोला : पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून शेतकरी आता फुलशेतीकडे (Floriculture) वळत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) अधिक उत्पादनक्षम आणि बाजारपेठेत (Market) मागणी असलेल्या सहा नवीन फुलांच्या जाती विकसित केल्या असून, आणखी दोन जातींवर संशोधन (Research) सुरू आहे.

विद्यापीठाने शेवंतीच्या 'पीडीकेव्ही-रागिणी' व 'वर्षा-यू', तसेच 'पीडीकेव्ही-बिजली सुपर' या जाती विकसित केल्या आहेत. ग्लॅडिओलस फुलांसाठी 'पीडीकेव्ही-रोशनी', 'पीडीकेव्ही-गोल्ड' आणि 'पीडीकेव्ही 'सातपुडा पर्पल' या जातींचा समावेश आहे.

तसेच, गॅलार्डियासाठी 'पीडीकेव्ही-रोहिणी' ही नवी जात विकसित करण्यात आली आहे. या जाती अधिकृतपणे मान्यताप्राप्त असून शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठ सध्या डेझीट आणि 'वर्षा-यू' शेवंती या दोन नव्या जातींवर संशोधन करत आहे. अधिक उत्पादनक्षम जाती उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने 'फुलशेती व प्रांगण विद्या' हा नवीन विभाग सुरू केला आहे.

या विभागाअंतर्गत विविध फुलांची प्रात्यक्षिके सादर केली जात असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांनी फुलशेतीकडे अधिक संख्येने वळावे,

फुलशेती करण्याकडे शेतकरी वळावा, या उद्देशाने भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध फुलांच्या नवीन जातीवर संशोधन करण्यात करण्यात येत असून, सहा नवीन फुलांच्या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. नवे संशोधनही हाती घेण्यात आले आहे. नवीन फुलांची मागणीही वाढली आहे. - डॉ. मनीषा देशमुख, सहायक प्राध्यापक, फुलशेती व प्रांगण विद्या विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

हे ही वाचा सविस्तर: Cotton Market Update: 'सीसीआय'ची कापूस खरेदी वांद्यात; जाणून घ्या काय आहे कारण

टॅग्स :शेती क्षेत्रफुलशेतीफुलंशेतीशेतकरीकृषी विज्ञान केंद्र