Join us

Food Grain Production देशात यावर्षी एकूण ३२८८.५२ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 9:18 AM

यावर्षी देशात एकूण ३२८८.५२ लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन, वर्ष २०२२-२३ मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या ५ वर्षांत (वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ मध्ये) झालेल्या ३०७७.५२ लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी २११.०० लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष २०२३-२४ साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे.गेल्या कृषी वर्षापासून, उन्हाळी हंगाम रब्बी हंगामापासून विलग करण्यात आला असून तो तिसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

म्हणून, लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पन्नाच्या या आगाऊ अंदाजामध्ये खरीप, रबी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामाचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने राज्य कृषी सांख्यिकी अधिकाऱ्यांकडून (एसएएसएएस) मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अंदाज तयार करण्यात आला आहे.

हाती आलेल्या आकडेवारीची वैधता तपासून, दूरस्थ संवेदक प्रणाली, साप्ताहिक पीकविषयक हवामान निरीक्षक गट आणि इतर संस्थांकडून मिळालेल्या माहितीशी ती जोडण्यात आली. त्याबरोबरच, हा अंदाज तयार करताना, वातावरणाची स्थिती, पूर्वीचे कल, दरातील चढउतार, बाजार समित्यांमध्ये कृषी उत्पादनांची आवक इत्यादी घटक देखील विचारात घेण्यात आले.

विविध पिकांच्या उत्पादनांचे तपशीलएकूण अन्नधान्य - ३२८८.५२ लाख टनतांदूळ - १३६७.०० लाख टनगहू - ११२९.२५ लाख टनमका - ३५६.७३ लाख टनश्री अन्न १७४.०८ लाख टनतूर - ३३.८५ लाख टनहरभरा - ११५.७६ लाख टनएकूण तेलबिया - ३९५.९३ लाख टन

सोयाबीन - १३०.५४ लाख टनरेपसीड आणि मोहरी - १३१.६१ लाख टनऊस - ४४२५.५२ लाख टन

कापूस - ३२५.२२ लाख गासड्या (प्रत्येकी १७० किलो)ताग - ९२.५९ लाख गासड्या (प्रत्येकी १८० किलो)

यावर्षी देशात एकूण ३२८८.५२ लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन, वर्ष २०२२-२३ मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या ५ वर्षांत (वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ मध्ये) झालेल्या ३०७७.५२ लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा यावर्षी २११.०० लाख टन अधिक धान्य उत्पादन होणार आहे.

खरीपातीलपीक उत्पादनाचे अंदाज तयार करताना, पीक कापणी प्रयोगांवर (सीसीईएस) आधारित उत्पन्न देखील विचारात घेतले आहे. आधीच्या अंदाजांसह, वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजाचे तपशील upag.gov.in येथे उपलब्ध आहेत.

टॅग्स :पीककेंद्र सरकारसरकारअन्नशेतकरीखरीपरब्बीपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार