महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय मुंबई पुरस्कृत, तसेच मैत्री मुंबई यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक विभागाद्वारे नाशिक येथे ४५ दिवसीय मोफत निवासी टेलरिंग रेडिमेड गारमेंट व फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
नाशिक जिल्हा उद्योग केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (सीएमईजीपी) योजनेत २५ ते ३५ टक्के अनुदानासह कर्ज घेऊन उद्योग सुरू करण्याकरिता फक्त अनुसूचित जमातीच्या महिला व पुरुषांसाठी हे प्रशिक्षण असेल.
प्रशिक्षणात मशिन चालवणे, कटिंग, स्टिचिंग, ब्लाउज-कुर्ती-सलवार, टाउजर-शर्ट, एप्रोन-पेटीकोट-फ्रॉक, फळ आणि भाजीपाला प्रक्रिया, विविध मसाले व बेकरी उत्पादने इत्यादी, तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षणात उद्योगसंधी, मार्केट सव्र्व्हे, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग, आयात निर्यात, ई- टेंडरिंग, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, नोंदणी व परवाने, कर्ज योजना, कारखाना भेटी आदी विषयांवर मार्गदर्शन मिळेल.
तर नाशिक, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटांतील सातवी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले फक्त अनुसूचित जमातीच्या महिला व पुरुषांना प्रवेश घेता येईल.
इच्छुकांनी १९/१२/२०२४ पूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन उद्योग सहसंचालक नाशिक, विभागीय अधिकारी एमसीईडी नाशिक आणि महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांनी केले आहे.
हेही वाचा : Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स