Lokmat Agro >शेतशिवार > Foodgrains production : देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढणार! मागच्या वर्षीच्या तुलनेत २६ लाख टनांची वाढ

Foodgrains production : देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढणार! मागच्या वर्षीच्या तुलनेत २६ लाख टनांची वाढ

Foodgrains production increasing The production of foodgrains in the country will increase 22 lakh tonnes will increase compared to last year | Foodgrains production : देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढणार! मागच्या वर्षीच्या तुलनेत २६ लाख टनांची वाढ

Foodgrains production : देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढणार! मागच्या वर्षीच्या तुलनेत २६ लाख टनांची वाढ

Foodgrains production in India : देशातील अन्नधान्यांच्या उत्पादनात यंदा चांगलीच वाढ होणार असल्याचा अंदाज सरकारने जाहीर केला आहे. तब्बल २२ लाख टन अन्नधान्य मागील वर्षीच्या तुलनेत वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Foodgrains production in India : देशातील अन्नधान्यांच्या उत्पादनात यंदा चांगलीच वाढ होणार असल्याचा अंदाज सरकारने जाहीर केला आहे. तब्बल २२ लाख टन अन्नधान्य मागील वर्षीच्या तुलनेत वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Foodgrains production in India : देशाच्या कृषी मंत्रालयाने यंदाच्या वर्षातील देशभरातली अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत अन्नधान्याचे उत्पादन चांगलेच वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील भात, गहू आणि श्रीअन्नाच्या उत्पादनात चांगली वाढ झाल्यामुळे एकूण अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषी मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलाय.

दरम्यान, देशभरातील एकूण अन्नधान्याचे उत्पादन हे २ हजार ३०० लाख मेट्रीक टनाच्या आसपास आहे. त्यामध्ये भात, गहू, पोषक/भरड तृणधान्ये, मका, कडधान्ये, श्री अन्न, तूर, हरभरा या पिकांचा सामावेश होतो. तर मंत्रालयाकडून कापूस, साखर, तेलबियांच्या उत्पादनाचा अंदाजही जाहीर करण्यात आला आहे.

मागच्या वर्षी म्हणजेच २०२२-२३ मध्ये अन्नधान्याचे देशातील उत्पादन हे ३ हजार २९६ लाख मेट्रीक टन एवढे होते. तर हे उत्पादन २०२३-२४ मध्ये २६.११ लाख मेट्रीक टनाने वाढून ३ हजार ३२३ लाख मेट्रीक टन होणार आहे. तांदूळ, गहू आणि श्रीअण्णा यांच्या चांगल्या उत्पादनामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे.

तांदळाचे उत्पादन हे २०२३-२४ मध्ये १ हजार ३७८ लाख मेट्रीक टन होण्याचा अंदाज आहे. तर हा अंदाज मागील वर्षीच्या १ हजार ३५७ लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनापेक्षा ते २०.७० लाख मेट्रीक टनाने जास्त आहे. त्याचबरोबर यंदा गव्हाचे उत्पादन हे १ हजार १३३ लाख मेट्रीक टन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गव्हाचे उत्पादन हे १ हजार १०५ लाख मेट्रीक टन एवढेच झाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गव्हाचे उत्पादन हे २७.३८ लाख मेट्रीक टनाने अधिक आहे. तर श्री अण्णांचे उत्पादन १७३ लाख मेट्रीक टनावरून १७५ लाख मेट्रीक टनावर जाण्याचा अंदाज आहे

देशभरातील पिकांचे उत्पादन

एकूण अन्नधान्य- ३ हजार ३२३ लाख मेट्रीक टन (विक्रमी)
तांदूळ -१ हजार ३७८.२५ लाख मेट्रीक टन (विक्रमी)
गहू - १ हजार १३३ लाख मेट्रीक टन (विक्रमी)
पोषक / भरड तृणधान्ये - ५६९.३६ लाख मेट्रीक टन
मका - ३७६.६५ लाख मेट्रीक टन
एकूण कडधान्ये - २४२.४६ लाख मेट्रीक टन
श्री अण्णा- १७५.७२ लाख मेट्रीक टन
तूर - ३४.१७ लाख मेट्रीक टन
ग्रॅम - ११०.३९ लाख मेट्रीक टन

एकूण तेलबिया- ३९६.६९ लाख मेट्रीक टन
भुईमूग - १०१.८० लाख मेट्रीक टन
सोयाबीन - १३०.६२ लाख मेट्रीक टन
रेपसीड आणि मोहरी - १३२.५९ लाख मेट्रीक टन (विक्रमी)

नगदी पिके
ऊस – ४ हजार ५३१.५८ लाख मेट्रीक टन
कापूस - ३२५.२२ लाख गाठी (प्रत्येकी १७० किलो)

Web Title: Foodgrains production increasing The production of foodgrains in the country will increase 22 lakh tonnes will increase compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.