Lokmat Agro >शेतशिवार > पावडर स्वरूपातील खाद्यपदार्थ आता दोन वर्षे राहतील ताजे, काय आहे नवे संशोधन? जाणून घ्या..

पावडर स्वरूपातील खाद्यपदार्थ आता दोन वर्षे राहतील ताजे, काय आहे नवे संशोधन? जाणून घ्या..

Foods in powdered form will now stay fresh for two years, what's new research? Find out.. | पावडर स्वरूपातील खाद्यपदार्थ आता दोन वर्षे राहतील ताजे, काय आहे नवे संशोधन? जाणून घ्या..

पावडर स्वरूपातील खाद्यपदार्थ आता दोन वर्षे राहतील ताजे, काय आहे नवे संशोधन? जाणून घ्या..

आयुर्वेदिक औषधींच्या उत्पादन क्षेत्रात हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे.

आयुर्वेदिक औषधींच्या उत्पादन क्षेत्रात हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पावडर स्वरुपातील आयुर्वेदिक औषधे किंवा या प्रकारातील घरगुती खाद्यपदार्थ वा अन्य पदार्थ आर्द्रतेमुळे अथवा पाणी सुटून खराब होत असतील तर त्याची काळजी करू नका. कारण, जळगावच्या डॉक्टरांनी व्यवसायातील समस्यांवर केलेले संशोधन हे अनेकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. यामुळे पावडर स्वरुपातील खाद्यवस्तू टिकण्याचा कालावधी १८ महिने ते दोन वर्षांपर्यंत वाढणार आहे. त्यांना भारत सरकारचे पेटंटही मिळाले आहे.

आयुर्वेदाचार्य वृषाली छापेकर यांना या संशोधनामुळे पावडर स्वरुपातील आयुर्वेदिक आयुर्वेदिक : औषधी, याच प्रकारातील घरगुती वापराचे पदार्थ आर्द्रतेमुळे किंवा पाणी सुटून खराब न होता अधिक दिवस चांगले राहू शकणार आहेत. या केवळ आयुर्वेदिक औषधी उत्पादने नव्हे, तर इतर क्षेत्रांतही वापर करता येणार आहे.

पावडर स्वरुपातील आयुर्वेदिक औषधे अधिक दिवस न टिकण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. हे कसे टाळता येईल? यावर त्यांनी व सहकाऱ्यांनी संशोधन सुरू केले. अडीच ते तीन वर्षे पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठात केलेल्या संशोधनातून फ्लुईडाइझ्ड बेसइ ड्रायर साकारण्यात यश आले. आयुर्वेदिक वनस्पतींचे चूर्ण आणि ग्रॅन्युल्सल्स यामधील आर्द्रता कमी करून औषध निर्मिती आणि साठवण कार्यासाठी या तंत्राचा उपयोग होणार आहे. आयुर्वेदिक औषधींच्या उत्पादन क्षेत्रात हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये वृषाली छापेकर यांना याचे पेटंटही मिळाले.

रेडी टू इट पेया'मुळे जळगावला सन्मान

■ आयुर्वेदाचार्य श्रीरंग छापेकर यांनी लाल तांदळापासून तयार केलेले रेडी टू इट पेया सूप याचा टायफॉईड आणि अशक्त्तपणा यावर यशस्वी उपयोग केला होता.

■ त्यावरील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केला होता. यासाठी त्यांना इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स, बंगळुरू यांच्यातर्फे रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड २०२३ मिळाला आहे.

Web Title: Foods in powdered form will now stay fresh for two years, what's new research? Find out..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.