Lokmat Agro >शेतशिवार > पाण्याचा ताण बसतोय, खरीप पीक आणि फळबागांसाठी हे उपाय केलेत का?

पाण्याचा ताण बसतोय, खरीप पीक आणि फळबागांसाठी हे उपाय केलेत का?

for crop water stress, follow this advisory | पाण्याचा ताण बसतोय, खरीप पीक आणि फळबागांसाठी हे उपाय केलेत का?

पाण्याचा ताण बसतोय, खरीप पीक आणि फळबागांसाठी हे उपाय केलेत का?

मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतोय, त्यासाठी पुढील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतोय, त्यासाठी पुढील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तज्ज्ञांनी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामूळे, सोयाबीन, खरीप ज्वारी व बाजरी पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. 

पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. 

पावसाच्या खंड काळात सोयाबीन पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे. 

खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. 

ऊस व हळद पिकाला पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनुसार पिकास ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. पावसाच्या खंडामूळे ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. 
पावसाच्या खंड काळात ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, हळद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. 

हळद पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त प्रादुर्भाव असल्यास 10 ‍किलो) प्रति एकर जमिनीतून वापर करावा. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन
नवीन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामुळे, संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. 

लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. 
आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. अंबे बहार धरलेल्या मोसंबी फळबागेत फळगळ थांबविण्यासाठी 100 लिटर पाण्यात एक किलो यूरिया + 30 मिली प्लॅनोफिक्स द्रावणाची फवारणी करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी 13:00:45 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू फळ बागेत ओलाव्याचा ताण सहनशीलतेसाठी बॅसिलस लिचिनोफॉरमीस या द्रवरूप जिवाणू खताची एकरी 2 लिटर प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा ठिबक संचाद्वारे द्यावे.

भाजीपाला व्यवस्थापन
भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. 

भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

वांगे  पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती
नवीन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिकांचे व्यवस्थापन
मागील काही दिवसात पावसाने दिलेल्या दिर्घ खंडामूळे, चारा पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी द्यावे. चारा  पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. 

तुती रेशीम उद्योग
रेशीम कोषाचा बाजारातील भाव कोषातील रेशीम धागा टक्केवारीवर अवलंबून असतो. तेव्हा ए ग्रेड कोष उत्पादन करण्यासाठी तुतीच्या पानाची प्रत उत्तम असावी लागते. त्यासाठी विषमूक्त व सेंद्रीय खत देणे गरजेचे आहे. एक किलो कोष होण्यासाठी कमीत कमी कोषाची संख्या हवी. साधारणपणे 550 ते 600 कोष एक किलोत बसले तर ए ग्रेड, 600 ते 700 कोष बसले तर बी ग्रेड, 700 ते 800 कोष बसले तर सी ग्रेड व 800 च्या वर बसले तर डी ग्रेड. एक कि.ग्रॅ. रेशीम धागा तयार होण्यासाठी लागणार कोष संख्या (किलो) त्यास रिनडाटा असे म्हणतात. मागील दशकात 8.5 किलो कोष वरून सध्या 6.5 किलो पर्यंत रीनडाटा ने मजल मारली आहे.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Web Title: for crop water stress, follow this advisory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.