Join us

बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:46 AM

कोकणात लिंबूवर्गीय फळे फारशी प्यापारीदृष्ट्या येत नाहीत. पपनसवगळता इतर लिंबूवर्गीय फळांना उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. कोकणातील उष्ण दमट हवामानामध्ये सिडलेस लिंबाची 'कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली येते.

कोकणात लिंबूवर्गीय फळे फारशी प्यापारीदृष्ट्या येत नाहीत. पपनसवगळता इतर लिंबूवर्गीय फळांना उष्ण व कोरड्या हवामानाची गरज असते. कोकणातील उष्ण दमट हवामानामध्ये सिडलेस लिंबाची 'कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली येते. या लिंबापासून स्ववॅश, सरबत, लोणचे, कॅन्डी यांसारखे पदार्थ चांगले होतात, या जातीला बहार हंगामाची आवश्यकता भासत नाही. वर्षभर एकेरी तसेच घोसात फळे लागतात, छाटणीमुळे उत्पादनात भर पडत असून, त्यामुळे फळे वर्षभर मिळतात, प्रक्रिया उद्योगाला आवश्यक लिंबू कोकण लेमन मुळे पुरवणे सहज शक्य आहे. 

याची साल जाड असून, बी विरहित फल, रसाला चांगला वास व स्वाद असतो. निव्वळ लिंबाची लागवड किंवा आंबा, नारळ यांसारख्या पिकांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी 'कोकण लेमन' ही जात चांगली आहे. कोकण लेमन' या पिकाला उष्ण व दमट हवामान पोषक असून, चांगला निचरा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत 'कोकण लेमन'ची झाडे चांगली वाढतात. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर हंगामात आठवड्यातून एक वेळ पुरेसे पाणी आवश्यक असते. इतर लिंबूवर्गीय फळांप्रमाणे कोकण लेमन जातीला बहार हंगामाची गरज नसते, कोकण लेमनची झाडे प्रति हेक्टरी १,१०० याप्रमाणे लागतात.

खड्डा खणून दहा किलो शेणखत त्याचबरोबर ९० ग्रॅम प्रति झाड नत्र, स्फुरद आणि पालाश पाच वर्षापर्यंत प्रतिवर्षी मात्रा वाढवून द्यावी. पाच वर्षानंतर २५ किलो शेणखत, ४५० ग्रॅम नत्र, स्फुरद, पालाश प्रति झाड अशी मात्रा द्यावी. खते दोन हप्त्यात द्यावीत, पावसाळी हंगामातील चार महिने वगळता अन्य दिवसात प्रति आठवडा २० लीटर पाणी द्यावे, 'कोकण लेमन' या सिडलेस लिंबाच्या जातीची अभिवृद्धी छाट कलम व गुटी कल या दोन पद्धतीने करता येते. मध्यम फांद्या छाटून सहा ते दहा इंचाचे छाट तयार करून लावावेत. मुख्या लवकर व जलद फुटण्यासाठी सिराडेक्स पावडर लावावी, गुटी कलमे हिवाळ्यातील थंडीचा हंगाम सोडल्यास वर्षभर करता येते. झाड खूप जोमदार असल्याने झाडांना वर्षातून निदान दोन वेळा हलकी छाटणी करणे फायद्याचे ठरते. एका झाडापासून २२२ ते २३ किलो लिंबाचे उत्पादन मिळते.

सीडलेस जात लोकप्रियमहाराष्ट्रातील कोकण विभाग सोडला तर अन्य सर्व जिल्ह्यात लिंबू लागवडीसाठी भरपूर वाव आहे. कोकणातील हवामान पोषक ठरेल अशी सीडलेस जात कोकण लिंब दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. लिंबापासून सायट्रिक अॅसिड, तेल तयार करतात, लेमोनेड, पेक्टीन, मार्मलेड तयार करण्यासाठी वापर करतात. पोटदुखी थांबविण्यासाठी आले, लिंबाचा रस साखर घालून सेवन करतात. अजीर्ण साठी लिंबू गुणकारी आहे. सीडलेस जाती अधिक लोकप्रिय असून, व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते.

टॅग्स :शेतकरीकोकणफळेपीकशेतीखतेविद्यापीठ