नाशिक : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या भोजापूर धरणातून कालव्याद्वारे लाभक्षेत्रात रब्बी आवर्तनातून 27 दिवसांत 1700 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्यात आला. यावर्षी तालुक्यात अल्प पर्जन्यमानामुळे सब्बीचे क्षेत्र भिजविण्यासाठी भोजापूर धरणातून सुटणाऱ्या आवर्तनाच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात नौदवण्यात आली होती. 27 दिवसात उपलब्ध 210 दशलक्ष घनफूट पाण्यातून जलसंपदा विभागाकडून विक्रमी 16500 है इतके सिंचन क्षेत्र भिजविण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच रब्बी हंगामातील आवर्तन महिनाभर सुरू होते कालदा सरू राहिल्याने परिसरातील विहिरींची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहेत. भोजापूर धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी गत महिन्यात आवर्तन सोडण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ पुरेशा स्वरुपात मिळणार होता. लाभक्षेत्रातील अल्प पर्जन्यमान, धरणातील अपुरा पाणी साठा, शेतकऱ्यांची रब्बी आवर्तनासाठीची दोडी शाखा आणि नांदूरशिंगोटे शाखेकडे नोंदविण्यात आलेली विक्रमी पाणी मागणी हे जलसंपदा विभागासाठी मोठे आव्हान होते.
पाणी गळती रोखण्यास यश
दरम्यान लाभक्षेत्रातील सिन्नर तालुक्यातील कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे, फत्तेपूर, निहाळे, दोडी (बु), दोडी (खु), गुलापूर व संगमनेर तालुक्यातील कन्हे, निमोण पिंपळे, सोनेवाडी, पळसखेडे, इत्यादी लाभक्षेत्रातील गावांना या आवर्तनातून लाभ मिळाला आहे. याबाबत सर्व शेतकरी व इतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आवर्तन काळात मुख्य कालवा तसेच दोडी (ब) येथे कालव्याला भगदाड पडले होते. परंतु जलसंपदा विभागाकडून तत्काळ कार्यवाही करून १५ मिनिटात पाणी गळती रोखण्यास यश मिळवले होते.
पहिल्यांदा महिनाभर आवर्तन
तसेच दुरुस्तीचे व साफसफाईचे कामे आवर्तन सुरू होण्यापूर्वीच मुख्य कालव्याची ३० वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत साफसफाई तसेच दुरुस्ती केल्याने आवर्तन काळात पाण्याचा अपव्यय कमी झाला. रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे कालवा फोडून पाणी चोरीला आळा घालण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आपसातील वाद मिटविण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात आली. अपवादात्मक परिस्थितीत फत्तेपुर-नि-हाळे क्षेत्रासही अल्प कालावधीसाठी पाणी पोहोचले होते.