पीक पेरल्याची कृषी खात्याकडे नोंद आहे, शिवाय विमाही भरला आहे. मात्र पिकांची ई. पीक नोंद करण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही ई-पीक नोंद होत नसल्याने आता १५ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
खरीप पिकांची नोंदणीस सुरुवात
अचूक नोंद व्हावी तसेच अपेक्षित उत्पादनावर पुढील वर्षांची देशाची गरज व त्यानुसार आयात-निर्यातीचे वेळीच नियोजन करता यावे यासाठी ई-पीक नोंद करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर सोपवली आहे. शेतकऱ्यांनी बांधावर बसून आपल्या मोबाइलवरून ई-पीक नोंद करावी, असे शासनाला अपेक्षित आहे. मागील दोन वर्षांपासून बरेच शेतकरी शासनाने गावोगावच्या शिवारात खरीप व रब्बी हंगामात पिकांची ई- घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकाची पीक नोंद करीत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अवघ्या एक लाख ५९ हजार शेतकऱ्यांनीच खरीप पिकांची ई-पीक पाहणी केली आहे. जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली असताना दोन लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक नोंद झाली आहे. जुलैपासून खरीप पिकांची ई नोंद करण्यास सुरुवात झाली. तीन महिन्यानंतरही पेरणी क्षेत्राप्रमाणे ई. पीक पाहणी झाली नसल्याने १५ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा
मुदतवाढ देण्यात आली आहे.
- पाऊस नसल्याने व अति पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यासाठी शासन ई-पीक पाहणी केल्याचे पाहणार आहे.
- त्यामुळे शेतकयांनी ई-पीक नोंद करणे आवश्यक आहे. कृषी व महसूल खात्याकडून त्यासाठी शेतकयांनी जनजागृती करण्यात येत आहे.
शेतकयांसाठी आपल्या मोबाइलवरून पिकांची ई नोंद करणे आवश्यक आहे. नोंद करणे अतिशय सोपे झाले आहे. शासनाकडून आर्थिक मदत अथवा इतर बाबीसाठी ऑनलाइन नोंद केल्याचा विचार झाला तर नोंद न झालेल्या शेतकऱ्यांची अडचण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत पीकनोंद करावी.- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
महसूलचे अधिकारी करणार मदत
शेतकन्यांना या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करता येत नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आता ई-पीक पाहणीसाठी तलाठी हे शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. एवढेच नाही तर पिकांची नोंद कशी करायची याचे मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे सातबारा हा कोरा राहणार नाही. आणि योजनांचा लाभही शेतकऱ्यांना घेता येणार आहे.