Join us

माजी सहकार आयुक्त अनिल कवडे यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती

By दत्ता लवांडे | Updated: February 5, 2024 20:54 IST

अनिल कवडे हे आधी सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.

पुणे : राज्याचे सध्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची साखर आयुक्तपदावरून बदली करण्यात  आली असून त्यांच्या जागी माजी सहकार आयुक्त अनिल कवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राज्य शासनाने बदलीचे आदेश काढले आहेत. 

दरम्यान, साखर आयुक्त असलेले चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली असून सध्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली करून त्यांना सहकार आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. 

अनिल कवडे हे येणाऱ्या काही दिवसातच निवृत्त होणार असून त्यांची प्रशासकीय सेवा केवळ काही दिवसांची राहिली आहे. ते 2003 सालच्या बॅचमध्ये आयएएस अधिकारी झाले होते. त्यानंतर त्यांनी राज्याच्या विविध पदांवर कार्य केले आहे. सहकार विभागातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

त्यांनी याआधी महसूल, भूसंपादन, जिल्हा पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य औद्यौगिक महामंडळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी या पदांवर काम केले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून ते सहकार आयुक्त पदावर कार्यरत होते. आता त्यांची बदली होऊन साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी