Join us

फोर्टीफाईड कि प्लास्टिकचा तांदूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:50 AM

तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला; मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याने हा फोर्टीफाईड तांदूळ आरोग्यवर्धकच आहे

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी परिसरातील रेशन दुकानांमध्ये लाभार्थीना दिलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळला असल्याबाबतचे 'लोकमत'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागात या तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला; मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याने हा फोर्टीफाईड तांदूळ आरोग्यवर्धकच आहे,' अशी माहिती तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

महाबळेश्वर तालुक्यातही राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थ्यांना फोर्टीफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झाली आहे. पाचगणी परिसरातील शाहूनगर व गोडवली परिसरात दोन रेशन धान्य दुकानांमध्ये लाभार्थीना दिलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळला असल्याचे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झाल्याने चर्चेसही ऊत आला होता.

याबाबत तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी माहिती देताना फोर्टीफाईड तांदूळ हा पाण्यावर तरंगू शकतो; मात्र तो सामान्य तांदळाप्रमाणे सेवनासाठी वापरला जातो. फोर्टीफाईड तांदळामध्ये लोह, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी १२ सूक्ष्म अन्नद्रव्ये असून, आरोग्याच्या दृष्टीने शासनाने जाणीवपूर्वक वितरण सुरू केले फोर्टीफाईड तांदळामधील लोह हेअसल्याचे पाटील यांनी सांगितले. अशक्तपणा व तांबड्या पेशीची कमतरता दूर करते.

टॅग्स :महाबळेश्वर गिरीस्थानपाचगणी गिरीस्थानअन्नसरकार