मिलेट्स म्हणजेच भरडधान्ये किंवा तृणधान्यांचे मानवी आहारामध्ये खूप महत्त्व आहे. भारतातील लोकांचे पारंपारिक अन्न हेच होते. पण हरितक्रांतीनंतर आपल्याकडे गहू आणि तांदळाचे आहारातील प्रमाण वाढत गेले आणि भरडधान्याचे प्रमाण कमी होत गेले. २०२३ हे वर्ष सर्वांनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे केले. त्यानंतर मिलेट्सचे महत्त्व पुन्हा जगाला कळाले. पण मिलेट्समध्ये असलेल्या ८ ते १० धान्यांची ओळख आपल्याला आहे का?
ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी 'कांगणी किंवा राळ' या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात.
कांगणी किंवा राळ (Foxtail Millets)
फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका) (कांगणी किंवा राळ)
* फॉक्सटेल तृणधान्य (सेक्टारिआ इटॅलिका) ही मराठीमध्ये कंगणी किंवा राळ या नावाने ज्ञात असून ग्लुटेनमुक्त धान्य आहे, ज्यात तंतुमय पदार्थ, प्रथिने व खनिजे जास्त प्रमाणात असतात.
* ते थियामिन, नियासिन व जीवनसत्व बी-६ याचा उत्तम स्त्रोत आहे.
* ते मॅग्नेशियम, पोटॅशियम व जस्त या खनिजांचा समावेश असलेला उत्तम स्त्रोत आहे.
* फॉक्सटेल मिलेट (कंगणी/राळा) हे कमी शर्करा असलेले अन्न आहे त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.
* कंगणी/राळ हे ऑक्सिडीकरण रोधी पदार्थांचा देखील चांगला स्त्रोत असून त्यामुळे आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत होते.
* डॉ. खादर वली यांच्या वैद्यकीय संशोधनातून असे सिध्द झाले आहे की, संधिवात, अपस्मार, मञ्जातंतुविषयक विकार आणि पार्किन्सन इत्यादींवर उपाय करण्यात कंगणी (राळा) (फॉक्सटेल मिलेट) यामुळे मदत होते.
(माहिती संदर्भ - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)