Lokmat Agro >शेतशिवार > सारथीमार्फत हरितगृहात फळे व भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण, कसा कराल अर्ज ?

सारथीमार्फत हरितगृहात फळे व भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण, कसा कराल अर्ज ?

Free training on fruit and vegetable production in greenhouse through Sarathi, how to apply? | सारथीमार्फत हरितगृहात फळे व भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण, कसा कराल अर्ज ?

सारथीमार्फत हरितगृहात फळे व भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण, कसा कराल अर्ज ?

सारथी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे येथे मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटाचे उच्च कृषी तंत्रज्ञानावर अधारित निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पात्रता धारक शेतकरी/युवक/युवती कडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

प्रशिक्षण तपशील:

प्रशिक्षणासाठी लाभार्थी निवड करिता अटी व शर्ती
१) उमेदवार मराठा, कुणबी, कुणबी मराठा व मराठा - कुणबी या प्रवर्गातील असावा.
२) उमेदवारचे वय १८ ते ५० वर्ष या दरम्यान असावे.
३) उमेदवारांचे मागील ३ वर्षाचे वार्षिक अर्थिक उत्पन्न हे रु. ८,००,०००/- पेक्षा कमी असावे.
४) उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यामध्ये अधिवास असावा.
इच्छुक पात्रता धारक उमेदवारानी खालील कागदपत्रे अर्जासोबत सादर (अपलोड) करावीत.
अ) विहित नमुन्यातील व फोटोसहीत परिपूर्ण अर्ज
आ) विहित नमुन्यातील प्रतिज्ञा पत्र
इ) जातीचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला (टी सी / एल सी)
ई) लाभाचे आर्थिक वर्षासाठी वैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेयर / तहसिलदार दाखला / ई डब्ल्यू एस.
उ) रहिवाशी प्रमाणपत्र / ईडब्ल्यूएस / ७/१२ उतारा
ऊ) आधार कार्ड

सर्वसाधारण सुचना
i) प्रशिक्षणाचे माध्यम मराठी असेल.
ii) सदर क्षमता बांधणी प्रशिक्षणे ही पूर्णकालीन निवासी असून प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सारथी पुणे यांच्यामार्फत करण्यात येईल.
iii) सदर क्षमता बांधणी प्रशिक्षण राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) मार्फत तळेगाव (दाभाडे), जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात येईल.
iv) प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून क्रमवार निवडक पात्र उमेदवारांची यादी NIPHT व सारथीचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,
v) ईच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज सारथी संकेतस्थळ https://sarthi-maharashtra.gov.in व्दारे अथवा थेट NIPHT चे संकेतस्थळ http://www.nipht.org वरील लिंक https://sarthi.nipht.org/ व्दारे सादर करावेत.
vi) अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
vii) प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणेसाठी येणारा प्रवास खर्च संबंधित प्रशिक्षणार्थीना स्वतः करावा लागेल.. viii) प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेवारांची यादी सारथी व NIPHT च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ix) बॅच तयार झाल्यावर उर्वरीत पात्र प्रसिक्षणार्थीचा विचार पुढील बॅचसाठी केला जाईल, याबाबतच्या सूचना सारथी व NIPHT संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
६) प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.
७) प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे घटक कालावधी व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार सारथी व NIPHT संस्थेकडे राखीव असतील.

प्रशिक्षण स्थळ पत्ता: राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, सर्व्हे क्र. ३९८-४०० CRPF कॅम्प जवळ, जुना पुणे- मुंबई महामार्ग. तळेगाव-दाभाडे, पुणे - ४१०५०६,
प्रशिक्षण समन्वयक: श्री. विश्वास जाधव, व्यवस्थापक (प्रशिक्षण)- 9423085894 कार्यालय 02114-255480
 
Web Title: Free training on fruit and vegetable production in greenhouse through Sarathi, how to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.