Lokmat Agro >शेतशिवार > सारथीमार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मोफत प्रशिक्षण, अर्जाची 'ही' अंतिम मुदत

सारथीमार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मोफत प्रशिक्षण, अर्जाची 'ही' अंतिम मुदत

Free Training to Officers of Farmers Producers Company in State through Sarathi, Last Date to Apply 25th August | सारथीमार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मोफत प्रशिक्षण, अर्जाची 'ही' अंतिम मुदत

सारथीमार्फत राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मोफत प्रशिक्षण, अर्जाची 'ही' अंतिम मुदत

सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.

सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीची मुख्य उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून संघटीतपणे प्रयत्न केल्यास या संस्था चांगल्या प्रकारे काम करू शकतात असे राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपनीना सिध्द केलेले आहे. कारण त्यांच्या स्थापनेपासून कंपनीची वाटचाल कशी असावी याचे अचूक मार्गदर्शन नाबार्ड, महाराष्ट्र स्पर्धात्मक विकास प्रकल्प किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून त्यांना वेळोवेळी मिळालेले आहे. परंतु राज्यात स्थापन झालेल्या अनेक कंपन्या शास्त्रोक्त मार्गदर्शनापासुन वंचित आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शनाची मोठी गरज आहे. ही गरज ओळखुन व त्यासाठी पुढाकार घेऊन सक्षम व शाश्वत कंपनी चालविण्यासाठी प्रशिक्षणाची सुविधा छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांनी उपलब्ध केलेली आहे.

सारथी हि संस्था महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे शेतकरी केंद्र बिंदु मानून शेतकरी कंपनीच्या लक्षित गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठो विनाशुल्क क्षमता बांधणी पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम योजना सन २०२३ २०२४ साठी घोषित केलेली आहे. या संस्थेमार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांचेशी सहकार्य करार (MoU) केलेला आहे. सदर संस्था सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी यांचे बळकटीकरण व सक्षमीकरणाचे काम राज्यात करीत आहे. या संस्थेकडे प्रशिक्षण राबविण्याचा अनुभव व तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे.

योजना
सारथी लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी) शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, सभासद व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पाच दिवसीय निवासी प्रशिक्षणाची विनाशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयतज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण साहित्य, चहा, नाश्ता, भोजन, निवास, क्षेत्रीय भेट व प्रमाणपत्र इत्यादी बाबी चा समावेश आहे.

योजनेचे उद्देश व समाविष्ट विषय
१) शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट यांचे आदर्श व्यवस्थापन कसे करावे. शेतकरी उत्पादक कंपनींना वित्त पुरवठा वैज्ञानिक प्रतिपूर्ती, कंपनीचे वित्तीय नियोजन व व्यवस्थापन विकास आराखडा तयार करणे.
२) कृषी माल निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनांना वाव, संधी व कार्यप्रणाली.
३) शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सभासदांना शाश्वत निविष्ठा पुरवठा.
४) बाजाराची गतिशीलता समजवुन घेणे.
५) शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालाची ऑनलाइन विक्री व्यवस्था .
६) कृषी मालाचे विपणन, साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, मुल्यसाखळी तयार करणे.
७) शेतकरी उत्पादक कंपनी सभासद विसंवाद, प्रशासन व लेखाकर्म, व्यवसायिक जोखीम व वित्तीय व्यवस्थापन.
८) केंद्र व राज्य पुरस्कृत शेतकरी उत्पादक कंपनीसाठी विविध योजना: शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम व्हावी, ती शाश्वत चालावी व त्यामध्ये शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग असावा यासाठी सारथी संस्थेमार्फत सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी वरील उद्दीष्ट्यांच्या आधारे योजना कार्यान्वित केलेली आहे.

निवडीचे निकष
१)शेतकरी उत्पादक कंपनी सभासद हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२) प्रशिक्षणासाठी पात्र व्यक्ती ही मराठा, कुणवी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील असावी व शेतकरी उत्पादक कंपनीची सभासद असावी.
३) प्रशिक्षणासाठी पात्र लक्षित गटातील व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय (EWS)/नॉन क्रीमिलीयर गटातील असावी. अथवा सदर सभासद शेतकऱ्यांच्या मागील ३ वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे र.रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. याबाबतसंबंधित तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा.
४) उत्पादक कंपनीची कंपनी कायदा २०१३ नुसार Register of Company (RoC) कडे नोंदणी झालेली असावी.
५) कंपनीच्या भागधारकांची संख्या ५० पेक्षा कमी नसावी.
६) शेतकरी हा नाबार्ड/किंवा इतर शासकीय योजनेद्वारे प्रशिक्षणासाठी अनुदान प्राप्त शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद नसावा.
७) एका कंपनीतील जास्तीत जास्त पाच व्यक्ती प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात.

अर्ज प्रक्रिया
प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज www.sarthi.maharashtragov.com व www.mahamcdc.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातुन प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

प्रशिक्षणार्थी निवड
शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे प्राप्त अर्जांपैकी मुल्यांकनाद्वारे अधिक गुणांक प्राप्त करणाऱ्या राज्यातील फक्त प्रथम १९२ शेतकरी उत्पादक कंपनीच्या लक्षित गटातील संचालक/सभासद/मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन २०२३-२०२४ मध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण
पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपुर, दापोली जि. रत्नागिरी

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढील दोन वर्ष निशुल्क मार्गदर्शन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधितांना व्यवसायिक संधी उपलब्ध करून देणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, निविष्ठा पुरवठा, मार्केट लिकेजेस, इक्विटी गॅन्ट, प्रोपोझल, शेतकरी उत्पादक कंपनी निगडीत योजना, बँक व वित्तीय संस्थांकडून निधी उपलब्धता, शेतकरी उत्पादक कंपनीशी निगडीत शासकीय अधिकारी इतर स्टेक होल्डर यांच्या मध्ये समन्वय साधने इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहे.

आवश्यकता असल्यास या संस्थांना कालानुरूप विविध नाविन्यपूर्ण विषयाचे पुन्हा पुढील आर्थिक वर्षात शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगतीच्या आधारे प्रशिक्षणाची अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या वतीने या योजनेचा अधिकाअधिक लाभ शेतकरी उत्पादक कंपनींनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. हेमंत जगताप प्रशिक्षण अधिकारी, एमसीडीसी, पुणे
8275371082
श्री. मयूर पवार
प्रशिक्षण समन्वयक, एमसीडीसी, पुणे
8308320360
 

Web Title: Free Training to Officers of Farmers Producers Company in State through Sarathi, Last Date to Apply 25th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.