देशातील टॅलेंटचा देशासाठीच वापर व्हावा
हवामान बदल होत असताना शैक्षणिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येत ग्राहक व उत्पादक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'देशातील टॅलेंट'चा देशासाठी वापर करावा, शेतकरी जगला तरच देश जगेल. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल यासाठी घराघरांतून आता कृती आवश्यक आहे.
-बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्था, नाशिक व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटक
एआय तंत्राचे शेतकऱ्यांना व्हावे ज्ञान
- शासकीय, निमशासकीय सेवेतील नोकरदार वर्गाला प्रत्येक महिन्याला पगार स्वरुपात शाश्वत हमी असते. शेतकऱ्यांना देखील शाश्वत हमीभाव मिळाला तर शेतकरी व त्यांचे मुलेबाळे सन्मानाने जगू शकतील. याशिवाय शेतकऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारखे तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देण्यासाठी मविप्र सारख्या शिक्षणसंस्थांनी पुढाकार घ्यायला हवा.
- शहरातून ग्रामीण भागांत पैशाचा प्रवाह वाहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांना इन्कमटॅक्स लावता येईल एवढे त्याचे उत्पन्न व उत्पादन वाढेल, असा हिशेब मांडत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- हवामान बदल होत असतांना शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी आयआयटी, आयआयएम मधील बुद्धीमान विद्यार्थ्यांना शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी आणले पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी हवामान शास्त्रज्ञ बनले पाहिजे.
-विलास शिंदे, सहयाद्री फार्म्सचे व्यवस्थापकीय संचालक
शेतकरी जगविण्यासाठी महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची
- शेतकरी जगविण्यासाठी महाविद्यालयांची भूमिका महत्त्त्वाची आहे. प्राध्यापकांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पारंपारिक पुस्तके व वर्गाच्या बाहेर आले पाहिजे.
- जगायचे असेल तर शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना पायावर उभे करीत त्यांचा आर्थिक विकास ही प्रत्येक प्राध्यापकाची जबाबदारी आहे.
-प्राचार्य डॉ. एस.एस. काळे, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय, दे. कॅम्प
शेतीसाठी ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा उपयोग
- अद्ययावत तंत्रज्ञान वापराने शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे शक्य आहे. पैसा कसा कमवायचा? यांचा अभ्यासक्रम बनवत प्रॅक्टीकल हवे. सेवा देत सुयोग्य नफा कमविणे हे पाप नाही.
- 'इंटरेस्ट व इमोशन' हे दोन फोर्स कुठलाही व्यवसाय व संवाद संबंध प्रस्थापित होतात. ब्रेन टू मशिन इंटरफेसिंग (बीटूएम), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), डेटा सायन्स व एनॅलिस्ट, सायबर सिक्युरिटी, रोबोट व कोबोट, ब्लॉकचेन, व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर), एग्युमेंटेड रियालिटी (एआय), मेटाव्हर्स, क्लाऊड काम्प्युटिंग, क्वांटम काम्प्युटर, डेवऑप, हायपरएटोमेशन, प्रोगामेबल लॉजिक कंट्रोल (पीएलसी), स्काडा, इंटरनेट मार्केटिंग व बिझनेस, मोबाईल एप्लिकेशन्स डिझाईन व डेव्हलपमेंट अशा अनेक अद्यावत इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजचा शेतीत वापर शक्य आहे.
- शैक्षणिक क्षेत्रात देखील यांवर काम करणाऱ्या सुयोग्य माणसांचा दुष्काळ दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. बुद्धी हवी कि रद्दी? हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. ज्ञान ही जादू , शक्ती आणि अस्तित्वाच्या लढाईत ऑक्सिजन आहे.
- वातावरण सूर्यापासून जमिनीपर्यंत कसे बदलते आणि आपल्या किचनचे बजेट येत्या काळात कोसळू नये यासाठी उपाययोजना तसेच जागतिक घडामोडी व शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या ही मुद्यांचा समावेश..
-प्रा किरणकुमार जोहरे, प्रमुख व्याख्याते
शेतीतील प्राणवायू
- प्राध्यापकांनी वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतांनाच शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी बांधावर देखील जावे. सौंदर्य प्रसाधनांवर होणारा खर्च हा अन्नधान्याच्या महिन्याच्या बजेट पेक्षा जास्त आहे.
- प्राध्यापक व विद्यार्थी यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत कळायला हवी. एका झाडापेक्षा एक शेत व त्यातील पिके जास्त प्राणवायू देते.
-कृषिभूषण तुकाराम बोराडे
शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक योजना कार्यरत
- शेतकऱ्यांच्या फायद्याच्या अनेक योजनांचा पाऊस पडतो आहे, मात्र शेतकऱ्यांपर्यंत त्यांची माहिती पोहचत नाही.
- भारतात किमान दोन वर्ष पुरेल इतका धान्यसाठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे दुष्काळ पडला तरी भारताचा पाकिस्तान किंवा श्रीलंका होणार नाही.
- शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. असे अनेक शेतकरी योजनांचा लाभ घेऊन समृद्ध झालेले आहेत.
-जे. आर. पाटील, कृषी उपसंचालक, नाशिक विभाग
या मान्यवरांची मेळाव्याला उपस्थिती
या कार्यक्रमात मविप्रचे माजी विद्यार्थी व सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचा पहिला मराठी कृषि उद्योजक पुरस्कार प्राप्त विलासराव शिंदे यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. व्यासपीठावर यावेळी आंतरराष्ट्रीय हवामान अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे, कृषिभूषण तुकाराम बोराडे, कृषि विभागाचे उपसंचालक जे. आर. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच मविप्रचे नाशिक ग्रामीण संचालक रमेश आबा पिंगळे, इगतपुरीचे संचालक ॲड. संदीप गुळवे, राजाराम धनवटे, लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा. भिमराज काळे, नाशिक बाजार समितीच्या संचालिका सविता तुंगार, माजी जि.प. सदस्य संजय तुंगार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड, आदर्श शिशू विहार शाळेच्या विकास समितीचे अध्यक्ष सचिन ठाकरे, छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, सेवक संचालक डॉ. एस.के. शिंदे प्राचार्य, सविताताई तुंगार, भिमराव काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस काळे आदी उपस्थित होते.
याशिवाय कौशल्या मुळाणे, रतन गोडसे, सुधाकर गोडसे, ज्ञानेश्वर पाळदे, विष्णु ढोकणे, सुनिल जाधव, गजीराम मुठाळ, शिवाजी हांडोरे, जय हांडोरे, अँड. अशोक आडके, ॲड. प्रकाश गायकर, अँड रविंद्र बोराडे. पी.बी. गायधनी, रत्नाकर गायकवाड, संग्राम करंजकर, मनोज गायधनी, विलास गायधनी, कैलास भांगरे आदीसह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य माजी विद्यार्थी संघाचे सदस्य, पंचक्रोशीतील शेतकरी सभासद, शेतकरी, मान्यवर व्यक्तींसह सर्व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या परिचय शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डी. टी. जाधव यांनी केले. आभार सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे यांनी मानले.