सोलापूर : जिल्ह्यातील अवघ्या सात साखर कारखान्यांकडून यंदाच्या गाळपासाठी आणलेल्या उसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे ५३३ कोटी ८८ लाख रुपये अद्याप दिले नसल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील श्री पांडुरंग पांडुरंग श्रीपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर, करकंब, ओंकार शुगर, म्हैसगाव (जुना विठ्ठल कॉर्पोरेशन) ओंकार शुगर चांदापुरी, व्ही. पी. शुगर, तडवळ या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कोणत्या कारखान्याचे किती देणे?
सिद्धेश्वर साखर कारखाना - २६ कोटी
संत दामाजी - ३३ कोटी ८१ लाख
श्री संत कुर्मदास - ५ कोटी ३८ लाख
लोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगर - १८ कोटी ३१ लाख
दि सासवड माळीनगर - १२ कोटी १३ लाख
लोकमंगल बीबीदारफळ - १७ कोटी ६१ लाख
लोकमंगल भंडारकवठे -५० कोटी
सिद्धनाथ शुगर तिर्हे - ३९ कोटी ६ लाख
जकराया शुगर - २८ कोटी ४८ लाख
इंद्रेश्वर शुगर, बार्शी - २२ कोटी ३५ लाख
भैरवनाथ शुगर, लवंगी - १४ कोटी ३७ लाख
युटोपियन शुगर - १५ कोटी ५१ लाख
भैरवनाथ आलेगाव - १६ कोटी ७१ लाख
बबनराव शिंदे तुर्कपिंपरी - ४२ कोटी ३१ लाख
जय हिंद शुगर - ४८ कोटी २९ लाख
आष्टी शुगर - ११ कोटी ५५ लाख
भीमा सहकारी टाकळी सिकंदर - ५ कोटी १४ लाख
सहकार शिरोमणी वसंतराव काळे - १३ कोटी ४१ लाख
सीताराम महाराज खर्डी - २५ कोटी
धाराशिव शुगर (सांगोला) - ५ कोटी ७२ लाख
श्री शंकर सहकारी - ४ कोटी ६८ लाख
अवताडे शुगर - २७ कोटी
श्री विठ्ठल सहकारी पंढरपूर - ४० कोटी ६५ लाख
येडेश्वरी बार्शी - ८ कोटी ५४ लाख
सरकारी देणी थकविल्याने गाळप परवाना न घेता गाळप करून दंड ठोठावलेल्या गोकुळ व मातोश्री साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे किती पैसे दिले व किती थकीत आहेत, ही माहिती साखर आयुक्त कार्यालयाला पाठविली नाही.
याशिवाय अनेक कारखान्यांनी साखर उतारा कमी दाखविल्याने 'एफआरपी'ही कमी बसत असल्याने अधिक रक्कम देय असताना टक्केवारी चुकीची दाखवली जाते.