Join us

FRP Sugarcane : ऊस उत्पादकांची ५३३ कोटी ८८ लाख रुपये थकबाकी; कोणत्या साखर कारखान्याकडे किती बाकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:01 IST

सोलापूर जिल्ह्यातील अवघ्या सात साखर कारखान्यांकडून यंदाच्या गाळपासाठी आणलेल्या उसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील अवघ्या सात साखर कारखान्यांकडून यंदाच्या गाळपासाठी आणलेल्या उसाचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे ५३३ कोटी ८८ लाख रुपये अद्याप दिले नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील श्री पांडुरंग पांडुरंग श्रीपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर, करकंब, ओंकार शुगर, म्हैसगाव (जुना विठ्ठल कॉर्पोरेशन) ओंकार शुगर चांदापुरी, व्ही. पी. शुगर, तडवळ या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे संपूर्ण पैसे दिल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

कोणत्या कारखान्याचे किती देणे?सिद्धेश्वर साखर कारखाना - २६ कोटीसंत दामाजी - ३३ कोटी ८१ लाखश्री संत कुर्मदास - ५ कोटी ३८ लाखलोकनेते बाबूराव अण्णा पाटील अनगर - १८ कोटी ३१ लाखदि सासवड माळीनगर - १२ कोटी १३ लाखलोकमंगल बीबीदारफळ - १७ कोटी ६१ लाखलोकमंगल भंडारकवठे -५० कोटीसिद्धनाथ शुगर तिर्हे - ३९ कोटी ६ लाखजकराया शुगर - २८ कोटी ४८ लाखइंद्रेश्वर शुगर, बार्शी - २२ कोटी ३५ लाखभैरवनाथ शुगर, लवंगी - १४ कोटी ३७ लाखयुटोपियन शुगर - १५ कोटी ५१ लाखभैरवनाथ आलेगाव - १६ कोटी ७१ लाखबबनराव शिंदे तुर्कपिंपरी - ४२ कोटी ३१ लाखजय हिंद शुगर - ४८ कोटी २९ लाखआष्टी शुगर - ११ कोटी ५५ लाखभीमा सहकारी टाकळी सिकंदर - ५ कोटी १४ लाखसहकार शिरोमणी वसंतराव काळे - १३ कोटी ४१ लाखसीताराम महाराज खर्डी - २५ कोटीधाराशिव शुगर (सांगोला) - ५ कोटी ७२ लाखश्री शंकर सहकारी - ४ कोटी ६८ लाखअवताडे शुगर - २७ कोटीश्री विठ्ठल सहकारी पंढरपूर - ४० कोटी ६५ लाखयेडेश्वरी बार्शी - ८ कोटी ५४ लाख

सरकारी देणी थकविल्याने गाळप परवाना न घेता गाळप करून दंड ठोठावलेल्या गोकुळ व मातोश्री साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे किती पैसे दिले व किती थकीत आहेत, ही माहिती साखर आयुक्त कार्यालयाला पाठविली नाही.

याशिवाय अनेक कारखान्यांनी साखर उतारा कमी दाखविल्याने 'एफआरपी'ही कमी बसत असल्याने अधिक रक्कम देय असताना टक्केवारी चुकीची दाखवली जाते.

अधिक वाचा: Sugarcane Crushing 2024-25 : राज्यात आतापर्यंत १०२ साखर कारखान्यांची धुराडी बंद; किती झाले साखर उत्पादन?

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसोलापूरराज्य सरकार