सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असले तरी बाजारात आंबे, टरबूज, कलिंगड, मोसंबी, संत्रा अशी फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच कमी पैशात ही फळे मिळत असल्यामुळे अनेकजण सध्या सुरू असलेल्या ऋतूचा विचार न करता ही फळे घेतात.
परंतु, उन्हाळ्यात खावेत अशी फळे पावसाळ्यात खाण्यात आल्यामुळे बॅक्टेरिया, बुरशी, ताप, सर्दी, पोटाचे इन्फेक्शन वाढतात. पावसाळ्यात निघणारी जांभूळ, डाळिंब, चेरी, फणस ही फळे खाणे शक्त्तिवर्धक ठरते.
कोणती फळं खाल?
जांभूळ : पावसाळ्याच्या दिवसात बाजारात जांभूळ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. या फळांत आयर्न, पोटॅशिअम, फोलेट तसेच व्हिटॅमिनचे प्रमाण अधिक असते. जांभूळ खाल्ल्याने मधुमेह, कर्करोग अशा रोगांवर देखील नियंत्रण राहते. तसेच पोटदुखीचा संक्रमण देखील कमी होते.
नासपती : हे फळ फायबरयुक्त असल्यामुळे अॅण्टिऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते. तसेच हृदयाचे आजारदेखील यामुळे जाणवत नाहीत.
लिची : शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढविण्यासाठी लिची अत्यावश्यक आहे. पावसाळ्यात देखील ही फळे खाल्ली जाऊ शकतात. तसेच लिची खाल्ल्यामुळे कॅल्शिअम सीचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
डाळिंब : उन्हाळ्यासह पावसाळ्यात देखील डाळिंब खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे पोटदुखीच्या कोणत्याही समस्या जाणवत नाहीत.
चेरी : पावसाळ्यात चेरी आवर्जून खाल्ली पाहिजे. यामुळे कॅल्शिअम ए, बी, सीचे प्रमाण वाढते. तसेच कॅल्शिअमचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या शिवाय चेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते.
कोणती फळं टाळाल?
पावसाळ्याच्या दिवसांत आंबे, टरबूज, खरबूज, मोसंबी, संत्रा, पपई अशा फळांचे सेवन करू नये. यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. पावसाळ्यात तापासह सर्दी, खोकला व पोटदुखी अशा आजारांची लागण या फळांमुळे होते.
पावसाळ्यात शक्यतो कमी गोड किंवा पाणचट दर्जाची असणारी फळे खावेत. ही फळे चवीला कमी असली तरी आरोग्याला शक्तिवर्धक असतात. पाणीदार फळांचे सेवन प्रकर्षाने टाळावे, यामुळे घसा, तोंड, पोट व छातीचे आजार होण्याची दाट शक्यता असते. - डॉ. अमित बिस्वास, आहारतज्ज्ञ, बीड.
हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म