Lokmat Agro >शेतशिवार > 'या' कुटुंबातील कर्ता पुरुष, स्त्री मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार निधी; वाचा योजेनची सविस्तर माहिती

'या' कुटुंबातील कर्ता पुरुष, स्त्री मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार निधी; वाचा योजेनची सविस्तर माहिती

Funds from National Family Benefit Scheme in case of death of male, female of 'this' family; Read detailed information about Yogen | 'या' कुटुंबातील कर्ता पुरुष, स्त्री मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार निधी; वाचा योजेनची सविस्तर माहिती

'या' कुटुंबातील कर्ता पुरुष, स्त्री मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार निधी; वाचा योजेनची सविस्तर माहिती

Rashtriy Kutumb Labh Yojana : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री, पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात.

Rashtriy Kutumb Labh Yojana : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री, पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात.

शेअर :

Join us
Join usNext

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री, पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबीयांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात.

या योजनेची अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे केली जाते. इच्छुकांनी तालुका पातळीवरील तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत दाखल अर्ज दोन महिन्यांच्या आत संबंधित तलाठ्याकडे चौकशीसाठी जातात. कागदपत्रांची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात. शासनाने नेमलेल्या शासकीय समितीसमोर हा अर्ज जातो.

तिथे पात्र असलेल्या अर्जाना मंजुरी दिली जाते. त्यानंतर सर्व पात्र लाभार्थ्यांची रक्कम कोषागारातून खात्यावर जमा होते.

काय लागतात कागदपत्रे ?

ओळखीचा पुरावा, मतदार ओळखपत्र, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, पाणीपट्टी पावती, सात बारा, आठ अ, भाडेपावती, दूरध्वनी देयक, उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, स्मशानभूमी पावती.

योजना अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे

या योजनेची अंमलबजावणी महसूल प्रशासनातर्फे केली जाते. इच्छुकांनी तालुका पातळीवरील तहसील कार्यालयात संपर्क साधून अर्ज भरून आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

संपर्क कोठे कराल?

योजनेच्या लाभासाठी तहसील कार्यालयात संपर्क साधावा.

काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?

• या योजनेंतर्गत, दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना एकरकमी मदत दिली जाते. जेव्हा कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू होतो. त्यांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाते.

• दाखल अर्ज दोन महिन्यांच्या आत संबंधित तलाठ्याकडे चौकशीसाठी जातात. कागदपत्रांची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात.

या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तातडीने संपर्क साधून अर्ज करावा. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा शाखा पुणे.

हेही वाचा : आला उन्हाळा शेतकरी ताई अन् दादांनो आपआपले आरोग्य सांभाळा

Web Title: Funds from National Family Benefit Scheme in case of death of male, female of 'this' family; Read detailed information about Yogen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.