Join us

चांदवड तालुक्यात अत्यल्प पावसात पेरणीचा जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2023 4:17 PM

चांदवड तालुक्यात शेतकरी अल्प पावसाच्या अत्यल्प ओलीवर खरीप पेरणीचा झुगार खेळतांना दिसतो. छातीवर दगड ठेऊन सकारात्मक भावनेतून लाखमोलाच सोयबीन, मका, भुईमुग आदी बियाणे तो काळ्या आईच्या कुशीत रुजवत आहे.

पावसाने दडी मारल्याने शेतकरी आला अडचणीत मातीचा गोळा झाला म्हणजे पेरणी योग्य वाफसा परंतु तशी परिस्थिती नाही. पण पेरणी लेट होत चालली म्हणुन नाईलाजास्तव पेरणी करावी लागत आहे. कारण उशीर झाला तर पुढचं पीक घेता येणार नाही. 

रेडगाव खुर्द परिसरासह चांदवड तालुक्यात अद्याप दमदार पाऊस नाही. सर्वत्र उन्हाळ्यागत परिस्थिती, पावसाअभावी पेरणीचे दिवस पुढे चालले असून, आज ना उद्या पाऊस येईल हा आशावाद उराशी बाळगून त्या अल्प पावसाच्या अल्प ओलीवर पेरणी करण्याचा झुगार बळिराजा खेळताना दिसतो.  पाऊस जर लवकर आला नाही तर बियाणे, खत, मशागत सर्व वाया जाण्याची भीती आहे. अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करून, गेल्या हंगामातील अनुभवातून काही बोध घेत पीक पेरणी, लागवड यांचे आडाखे बांधून शेतकरी दरवर्षी नव्या उमेदीने काळ्या आईच्या कुशीत हिरवे स्वप्न पेरत असतो. त्याअनुसार यंदाही तो कंबर कसून होता. परंतु नको तेव्हा भर उन्हाळ्यात ठाण मांडून राहिलेल्या पावसाने मात्र आहे. पावसाळा सुरू होताच जणु गाशा गुंडाळला.

शेतीच्या मशागतीला पुरक असलेल्या मान्सून पूर्व पावसाने दांडी मारली, पुढे मृगाचे वाहन हत्ती नक्षत्र सर्वांना न्हाऊन घालेल अशी आशा होती तीही फोल ठरली. आद्रा नक्षत्राचे तेच झाले नंतर आषाढीची आस लागली पण ती देखील फोल ठरली. आता पुर्नवसु नक्षत्र कोरडे चालले तालुक्यात अद्याप बैलाच्या पाऊलखुणात तरी पाणी साचेल इतका पाऊस नाही. कधी तरी थोडीसी भूरभूर येते त्यामळे थोडीफार जमीन ओली भीती आहे.- नानासाहेब काळे, शेतकरी, रेडगाव खुर्द

जमिनीत ओल आवश्यकपेरणीसाठी ७५ ते १०० मि. मी खोल ओल असली पाहिजे परंतु ती ओल कधी होणार हा प्रश्न आहे. हंगाम वाया जातो की काय असे चित्र आहे. पावसाळ्याचा जवळपास दीड महिना उलटत असताना खरीप पेरणीला पुरक पाऊस नाही. अशा परिस्थितीत पेरण्या किती उशिरा करणार, म्हणुन पाऊस एका घडीत येईल, पेरणी घडीत होणार नाही..

टॅग्स :खरीपमोसमी पाऊसपेरणीशेती