गांडूळ खत हे एक पर्यावरणपूरक आणि प्रभावी खत आहे. गांडूळ खत हे गांडूळांच्या माध्यमातून शेणखतावर प्रक्रिया करून तयार होते. जे मातीला आवश्यक असलेले पोषक तत्त्व देण्यास मदत करते.
रासायनिक खतांच्या तुलनेत गांडूळ खत मातीला अधिक सुपीक बनवते. गांडूळ खताच्या वापरामुळे मातीचे आरोग्य सुधारते तसेच पिकांच्या उत्पादनात वाढ होते. गांडूळ खताचे फायदे अनेक आहेत ज्यातील काही फायदे पुढीलप्रमाणे.
मातीची उत्पादकता वाढवते
गांडूळ खतामुळे मातीतील पोषक तत्त्वांचे संतुलन राखण्यास मदत होते. तसेच माती अधिक सुपीक आणि उत्पादनक्षम होते.
मातीची पोत सुधारतो
गांडूळ खतामुळे मातीमध्ये हवा आणि पाणी चांगले मिसळतात ज्यामुळे मातीची जलधारण क्षमता आणि संरचना सुधारते.
संपूर्ण पोषण
गांडूळ खताद्वारे मातीला नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक तत्त्व पुरविले जातात. परिणामी पिकांची जलद योग्य वाढी दिसून येते.
मातीतील सूक्ष्मजीवांचे रक्षण
गांडूळ खत मातीतील सूक्ष्मजीवांचा विकास वाढवतो ज्यामुळे मातीच्या जैविक समतोल अबाधित राहते.
पर्यावरणपूरक खत
गांडूळ खत रासायनिक खतांपेक्षा पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित आहे. यामुळे पिकांचे उत्पादनही निरोगी आणि सुरक्षित राहते.
कमी खर्चात अधिक फायदा
शेतकऱ्यांना रासायनिक खतांपेक्षा कमी खर्चात गांडूळ खत तयार करता येते किंवा विकत घेता येते ज्यामुळे पिकांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाणही वाढते.