Join us

gardening tips: पावसाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 19, 2024 2:57 PM

अधिक पावसात रोपांना बुरशी लागण्याचा धोका अधिक, कशी घ्यावी काळजी?

राज्यात सध्या पावसाळ्याला अखेर सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला तुमच्या घरातील झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते.या काही सोप्या टिप्सने तुमचं काम सोपं करा..

झाडाची खालची बाजू स्वच्छ करा

पावसाळ्यात झाडांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी मिळते. त्यामुळे कुंड्यांमधून अधिकचे पाणी काढून टाकणे महत्वाचे आहे. कुंडीच्या खालच्या बाजूला जे ड्रेनेज होल तपासा आणि ब्लॉक झाले नाहीत ना याची खात्री करा.

कुंड्या पूर्णपणे भरा

पावसाळ्यात अधिक पाण्यामुळे कुंड्यांमधील माती वाहून जाते. कुंडी भरताना दोन भाग माती आणि एक भाग शेणखत टाकून पूर्ण कुंड्या भराव्या. हे वरच्या बाजूला पाणी अडकण्यापासून प्रतिबंधीत करेल.

बुरशीनाशक वापरा

पावसाळ्यात बुरशीचे आक्रमण होणे अतिशय सामान्य आहे. ऊन कमी झाल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे रोपांना बुरशी येऊ शकते. परिणामी रोपांवर बुरशीनाशकाचा वापर करावा. दर १० ते १५ दिवसांनी कडूलिंबाच्या पानांचे पाणी रोपांवर फवारल्याने रोपे निरोगी राहतील.

छाटणी करा

रोपे किंवा कलमांची पुर्नलागवड करण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. तुम्ही मूळ रोपांची छाटणी करून रोपे इतरत्र लाऊ शकता. याने जलद आणि निरोगी वाढ होण्यास मदत हाेते.

जास्त पाणी देणे टाळा.

कमी सुर्यप्रकाश आणि अधिक पाऊस यामुळे मातीत ओलावा राहतो. त्यामुळे वरून अधिक पाणी देण्याची गरज नसते. अधूनमधून माती उकरल्याने मातीतील हवा खेळती राहण्यास मदत होते.

सुर्यप्रकाशाची खात्री

पावसाळ्यात रोपांना सुर्यप्रकाश मिळणं कठीण असते. आठवड्यातून किमान दोन किंवा तीनवेळा रोपांना सुर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी हलवा.

टॅग्स :बागकाम टिप्समोसमी पाऊसपाऊस