Join us

Gardening Tips : परसबागेसाठी कुठल्या भाज्यांची निवड करावी, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 3:46 PM

Gardening Tips : आता पावसाळ्याचे दिवस (Rainy Season)  सुरु झाले असून घराच्या मागच्या बाजूला परसबाग करण्याचे काम सुरु आहे. ...

Gardening Tips : आता पावसाळ्याचे दिवस (Rainy Season)  सुरु झाले असून घराच्या मागच्या बाजूला परसबाग करण्याचे काम सुरु आहे. अनेकदा परसबागेत कुठल्या भाज्यांची लागवड करावी, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असतो. शिवाय कुठल्या भाज्या आहारासाठी चांगल्या, कुठल्या हंगामात कुठल्या भाज्यांची लागवड (Vegetable gardening) करणे अपेक्षित असते. या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून मिळणार आहेत. 

परसबागेसाठी भाज्यांची निवड

कार्बोहायड्रेटयुक्त भाज्या : बटाटा, रताळी, सुरण, आळू, बीटरूट, इत्यादी. वाल, श्रावण घेवडा, शेवगा, चवळी, गवार,प्रोटीनयुक्त भाज्या : वाटाणाराजगिरा, बाला (ब्रॉड बीन), इत्यादी. जीवनसत्त्व 'अ'युक्त भाज्या : पिवळ्या रंगाचे गाजर, पालक, सलगम, राजगिरा, पिवळ्या रंगाची रताळी, तांबडा भोपळा, पानकोबी, मेथी, टोमॅटो, कोथिंबीर, इत्यादी.जीवनसत्त्व 'ध' युक्त भाज्या : वाटाणा, वाल, लसूण, आळूचे कंद (आरवी), इत्यादी.जीवनसत्त्व 'क'युक्त भाज्या : टोमॅटो, सलगम, हिरवी मिरची, फुलकोबी, नवलकोल, मुळचाची पाने आणि शेंगा, राजगिरा, इत्यादी.कॅल्शियमयुक्त भाज्या : बीटरूट, राजगिरा, मेधी, सलगमची पाने, कोथिंबीर, तांबडा भोपळा, कांदा, टोमॅटो, इत्यादी.पोटॅशियमयुक्त भाज्या : रताळी, बटाटे, कारली, मुळा, बाल. फॉस्फरसयुक्त भाज्या लसूण, वाटाणा, कारली.लोहयुक्त भाज्या : कारली, राजगिरा, मेथी, पुदिना, पालक, वाटाणा.

परसबागेतील हंगामी भाज्या

खरीप किंवा पावसाळी हंगामातील भाज्या (जलै ते ऑक्टोबर) : भेंडी, चवळी, गवार, मिरची, होबळी मिरची, वाल, घोराही, दोडकी, कारली, काकडी, टिंडा, परवल, दुधीभोपळा, मुळा (खरीप) गाजर (खरीप), पालक, रताळी, राजगिरा, वांगी, टोमॅटो व पुलकोबी (खरीप जाती)रब्बी किंवा हिवाळी हंगामातील भाज्या (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) : बटाटे, फुलकोबी, पानकोबी, नोलकोल, मुख्यू सलगम, गाजर, बीटरूट, कांदा, लसूण, लीक, ब्रॉड बीन, लेट्यूस, सिलेरी, वाटाणा, पालक, मेथी, मोहरी, कोथिंबीर, टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, वाल.

परसबागेतील हंगामी भाज्या 

उन्हाळी हंगामातील भाज्या (मार्च ते जून) : भेंडी, चवळी, गवार, टोमॅटो, यांगी, मिरची, कोवळी मिरची, श्रावण घेवडा, तांबडा भोपळा, दुधीभोपळा, कारली, योसाळी, दोडकी, काकडी, कोहळा, हिंडा, पडवळ, करटोली, राजगिरा, पालक, अॅस्परागत, उन्हाळी मुख्य.

संकलन : पवन चौधरी, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, केव्हीके मालेगाव

टॅग्स :बागकाम टिप्सशेतीशेती क्षेत्रनाशिक