भारतातील विविध ऋतू आणि कृषी-हवामान विषयक यांना अनुकूल ठरणाऱ्या लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत. तसेच,पुणे येथील आयसीएआर-अखिल भारतीय कांदा आणि लसूण संशोधन प्रकल्प नेटवर्कच्या (आयसीएआर-एआयएनआरपी ऑन ओ अँड जी) माध्यमातून देशात विविध ठिकाणी स्थान-विशिष्ट स्वीकारविषयक चाचण्या करण्यात येत आहेत.
आयसीएआर-एआयएनआरपी ऑन ओ अँड जी च्या माध्यमातून देशात सहा ठिकाणी (महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (उटी) खरीप हंगामात लागवड करण्यासाठी सुयोग्य जाती निश्चित करण्यासाठी तीन वर्षे क्षेत्र चाचण्या करण्यात आल्या. भीमा पर्पल आणि जी-२८२ या दोन जातींनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू (उटी) या तीन ठिकाणी ३० ते ४० क्विंटल प्रती हेक्टर इतके उत्पादन देत उत्तम कामगिरी केली. मात्र, रबी हंगामातील उत्पादनाच्या तुलनेत खरीप हंगामातील उत्पादन खूप कमी होते. कर्नाटकातील लसूण उत्पादक सध्या गदग लोकल या तेथील स्थानिक जातीची लागवड करत आहेत आणि ही जात तेथे चांगले उत्पादन देत आहे.
त्याशिवाय, जी-३८९ नामक लसणाची आधुनिक जात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात लागवडीसाठी अधिक योग्य ठरते आहे.
वर्ष 2021-22 आणि 2022-23 मध्ये देशात उत्पादित (पहिला आगाऊ अंदाज) लसूण पिकाचा तपशील खालीलप्रमाणे
वर्ष | उत्पादन (टनांमध्ये) |
२०२१-२२ | ३५२३ |
२०२२-२३ (पहिला आगाऊ अंदाज) | ३३६९ |