Join us

Gavara Farming: कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव'; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:40 IST

Gavara Farming: कमी पाणी, हलकी जमीन तरी गवारीला किलोला चांगला 'भाव' मिळतोय त्यामुळे आता शेतकऱ्यांना अधिक उत्पादनास मदत मिळणार आहे.

परभणी : हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत कमी पाणी, कमी कालावधीत हमखास नफा मिळवून देणारे पीक म्हणून सध्या गवारकडे पाहिले जात आहे. परभणी जिल्ह्यात आता शेतकरी मोठ्या प्रमाणात गवार पिकाच्या (Gavara Crop) उत्पादनाकडे वळले असल्याचे दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे रासायनिक खते व इतर सर्व पोषक द्रव्यांचा वापर करून विविध पिके (Crop) हलक्या जमिनीत घेतली जातात. मात्र, त्यातून उत्पादन अपेक्षित मिळत नाही. मात्र, दुसरीकडे गवार ही हलक्या जमिनीत शेतकऱ्यांना (Farmer) चांगला नफा मिळवून देत आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये सध्या शंभर हेक्टरवर शेतकऱ्यांनी गवारची लागवड (Cultivation) केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक भाजीपाल्यामध्ये वांगी, शेवगा, कोबी व टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. मात्र, नागरिकांची मागणी गवारला दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरीही नागरिकांच्या मागणीनुसार (Demand) पिके घेताना दिसून येत आहेत.

गवार हलक्या जमिनीत येते

* परभणी जिल्हा हा सुपीक जमिनीचा असल्याची ओळख आहे. मात्र जिंतूर, सोनपेठ त्याचबरोबर परभणी तालुक्यातील काही भाग हा खडकाळ जमिनीचा आहे.

* १०० रुपये किलो प्रमाणे गवार सध्या विक्री होत आहे.

* येथील शेतकऱ्यांना पिके घेताना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, दुसरीकडे गवार ही हलक्या जमिनीत येत असल्याने शेतकरी इतर भाजीपाल्यांपेक्षा गवार घेण्यासाठी सरसावल्याचे दिसून येतात.

गवारीत व्हिटॅमिन ए, बी, सी

* बाजारात सध्या शेवगा, वांगी, कारले, मेथी, शेपू, पालक, कोबी यासह विविध भाज्या शेतकरी व व्यापारी विक्रीसाठी घेऊन येतात.

* सध्या फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्याचे तापमान हे ३६ अंशावर पोहोचले आहे. भाज्यांना नागरिकांकडून मागणीही वाढली आहे.

* मात्र, दुसरीकडे गवारीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी. असल्याने नागरिक इतर भाज्यांपेक्षा गवारीला अधिकची मागणी करतात.

* अनेक वेळा या भाजीची पूर्तता करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागते.

गवार लहान - मोठ्यांच्या पसंतीची

एका कुटुंबात अनेक जण काही भाज्यांसाठी नाक मुरडतात. त्यामुळे महिलांची मोठी पंचायत होती. मात्र, दुसरीकडे गवार हे पोषक तत्त्वांनी भरल्याने लहान मोठ्यांच्या पसंतीस उतरते. बाजारातही गवार भाजीला मोठी मागणी आहे.

परभणी जिल्ह्यात आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गवार विक्रीसाठी येत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: बदलत्या हवामानाचे 'हे' आहे कारण; जाणून घ्या IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरी