Lokmat Agro >शेतशिवार > चंद्रपुरात फुलणार गावरान रानभाज्यांचा महोत्सव, १० ते १५ ऑगस्टपर्यंत आयोजन

चंद्रपुरात फुलणार गावरान रानभाज्यांचा महोत्सव, १० ते १५ ऑगस्टपर्यंत आयोजन

Gavran wild vegetable festival will be organized in Chandrapur from 10th to 15th August | चंद्रपुरात फुलणार गावरान रानभाज्यांचा महोत्सव, १० ते १५ ऑगस्टपर्यंत आयोजन

चंद्रपुरात फुलणार गावरान रानभाज्यांचा महोत्सव, १० ते १५ ऑगस्टपर्यंत आयोजन

आहारात रान भाज्यांचा समावेश होऊन आरोग्य संवर्धन व्हावे, रान भाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या हेतूने जिल्हा कृषी ...

आहारात रान भाज्यांचा समावेश होऊन आरोग्य संवर्धन व्हावे, रान भाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या हेतूने जिल्हा कृषी ...

शेअर :

Join us
Join usNext

आहारात रानभाज्यांचा समावेश होऊन आरोग्य संवर्धन व्हावे, रानभाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या हेतूने जिल्हा कृषी विभाग व आत्माच्या वतीने १० ते १५ ऑगस्ट या कालावधीत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन जिल्हाभरात केले आहे. १० ऑगस्टला पंचायत समिती बल्लारपूर येथून रानभाजी महोत्सवाची सुरुवात होणार आहे. १५ ऑगस्टला कृषी भवन, चंद्रपूर येथे सांगता होणार आहे.

रानातील शिवारातील नैसर्गिकरीत्या उगवलेल्या रानभाज्या, फळभाज्या कंदभाज्यामध्ये शरीराला आवश्यक पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व कळावे, विक्री व्यवस्था उपलब्ध व्हावा, यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालन प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

असे आहे रानभाज्या महोत्सवाचा कार्यक्रम

  • १० ऑगस्ट पंचायत समिती सभागृह, बल्लारपूर येथून महोत्सवाला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्ट देशमुख कॉम्पलेक्ससमोर चिमूर, पंचायत समिती सिदेवाही, तहसील कार्यालय, राजुरा, तहसील कार्यालय, पोंभुर्णा, तहसील कार्यालय, कोरपना येथे आयोजित केले आहे. १२ ऑगस्ट तालुका कृषी अधिकारी मूल, नग- रपरिषद, भद्रावती, १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय, सभागृह सावली, कांचणी एफपीसी आनंदवन चौक, वरोरा, पंचायत समिती सभागृह, नागभीड, पंचायत समिती सभागृह, ब्रह्मपुरी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, गोंडपिपरी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिवती येथे होणार आहे. समारोपीय कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी कृषी भवन, चंद्रपूर येथे होणार आहे.

Web Title: Gavran wild vegetable festival will be organized in Chandrapur from 10th to 15th August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.