Join us

पाऊस लांबलाय? मोफत बियाणे मिळवा अन बाजरी, ज्वारी पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2023 4:12 PM

शेतकरी कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहावे आणि सर्व पौष्टिक अन्न त्याला शेतशिवारात उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने मिनी किट वितरणाचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६ हजार मिनी किट सुपूर्द केल्या जाणार आहेत.

यंदा जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. भरडधान्य पेरणीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणांची मोफत किट दिली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात या किटचे वितरण करणे सुरू झाले आहे. हल्ली जिल्ह्याला १६ हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी या किटचे वाटप सुरू झाले आहे.

शेतकरी कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहावे आणि सर्व पौष्टिक अन्न त्याला शेतशिवारात उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने मिनी किट वितरणाचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १६ हजार मिनी किट सुपूर्द केल्या जाणार आहेत. पाच हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत या किटचे वितरण करण्यात आले आहे. महाबीज आणि एनएससी कंपनीकडे याचे काम सोपविण्यात आले आहे.

२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या अंतर्गत शेती तेथे पौष्टिक तृणधान्य हा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. या योजनेमध्ये ज्वारी, बाजरी, राळा, कोदो, राजगिरा यासारखे पौष्टिक भरडधान्य बीज शेतकऱ्यांना दिले जात आहे.

किती क्षेत्रासाठी किती बियाणे मिळणारया योजनेमध्ये एक लाख ७ हजार १६० किट उपलब्ध होणार आहेत. त्यात ज्वारी ३१ हजार ७५०, बाजरी ३९ हजार ६९०, राळा १ हजार ५८७, कोदो ७ हजार ९४० आणि राजगिरा ११ हजार ९१० किट उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यातील ५० हजार किट वितरित करण्यात आल्या आहेत. याशिवाय क्रॉप्ट कॅफेटेरिया अंतर्गत ३ हजार ७८ किट देण्यात आल्या आहेत. 

पेरा वाढण्याची शक्यतापाऊस लांबल्याने भरडधान्याचा पेरा  वाढण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यात मृग टाकण्यास इच्छुक नक्षत्रापासूनच पावसाने हुलकावणी दिली आहे. यामुळे लागवड केलेले कपाशी, तूर व सोयाबीन बियाणे उमलण्यापूर्वीच करपत आहे. आता पाऊस अधिक लांबल्यास भरड- धान्यासह आपत्कालीन बियाणांचाच वापर करावा लागणार असल्याचे शेतकरी सांगतात.

मिनी किटमध्ये कोणते बियाणे मिळणार■ मिनी किटमध्ये शेतकऱ्यांना विविध प्रकारचे भरडधान्य दिले जाणार आहे. नियमित पिकांसोबत भरडधान्याचे पीक शेतशिवारामध्ये पिकविण्यासाठी यातून प्रयत्न होणार आहेत. यामध्ये २०० ग्रॅम ज्वारी, १०० ग्रॅम बाजरी, १०० ग्रॅम राळा, १०० ग्रॅम कोदो, १०० ग्रॅम राजगिरा बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

■ यासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्याल-याकडे संपर्क करायचा आहे. भरडधान्य असणाऱ्या लाभार्थ्यांनाच ही किट दिली जाणार आहे. अंतरपीक म्हणून सुरक्षित जागी यापासून उत्पादन घेतले जाणार असल्याचे अधिकायांकडून सांगण्यात आले.

 हरित क्रांतीमुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली. याचवेळी पारंपरिक पिकांकडे दुर्लक्ष झाले. या भरडधान्यांपासून पौष्टिक तृणधान्य कुटुंबात उपलब्ध होण्याचे प्रमाण थांबले. भरडधान्यात विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि उष्मांकदेखील उपलब्ध होतात. यासाठी शेतकन्यांनी भरडधान्य पेरणीवर अधिक भर द्यावा. याकरिता शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.- प्रभाकर शिवणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.