कृषीसह विविध उत्पादनासंबंधित भौगोलिक निर्देशांक (जीआय) घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याने देशात पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. आतापर्यंत मिळालेल्या एकूण २९ भौगोलिक निर्देशांकामध्ये (कृषी व बिगरकृषीसह) नुकतीच नव्याने नऊ जीआय उत्पादनांची भर पडली आहे.
देशाच्या विविध प्रांतात तयार होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू किंवा शेती, औद्योगिक उत्पादने ही त्या त्या भागाची वैशिष्ट्ये आहेत. काही उत्पादनेही अन्यत्र बनत नाहीत किंवा तितक्या दर्जाची नसतात. म्हणून अशा भौगोलिक वैशिष्ट्याच्या वस्तू, उत्पादनांचे वेगळेपण जगासमोर यावे, यासाठी केंद्राने भारतात असे मानांकन देण्यासाठी २००१ मध्ये कायदा झाला. त्यानंतर २००३ मध्ये प्रत्यक्षात मानांकनासाठी नोंदणीला सुरुवात झाली.
जीआय कृषि उत्पादनेकृषी संबंधित जीआय (कंसात ज्याच्या नावे अर्ज प्रस्ताव)
- पानचिंचोळी चिंच - पानचिंचोली, ता. निलंगा, जि. लातूर (पानचिंचोली पातडी चिंच उत्पादक संघ)
- बोरसुरी तूर डाळ - बोरसुरी, ता. निलंगा, जि. लातूर (बोरसुरी तूरडाळ उत्पादक संघ)
- कास्ती कोथिंबीर - आशिव, ता. औसा, जि. लातूर (कास्ती कोथिंबीर शेतकरी उत्पादक संघ)
- बदलापूर जांभूळ - जि. ठाणे (जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट, बदलापूर)
- बहाडोली जांभूळ - (जि. पालघर) (बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट, बहाडोली)
- दगडी ज्वारी - जालना (जय किसान शेतकरी गट, मात्रेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना)
- कुंथलगरी खवा, पेढा - धाराशिव (मराठवाडा जीआय संवर्धन संघ, उदगीर, लातूर)