Lokmat Agro >शेतशिवार > GI tag Product Scheme : तुमच्या शेतमालाल जीआय मानांकन आहे? मग 'या' योजना तुमच्यासाठी

GI tag Product Scheme : तुमच्या शेतमालाल जीआय मानांकन आहे? मग 'या' योजना तुमच्यासाठी

GI tag Product Scheme Is your agricultural product GI rated msamb scheme for agriculture product selling | GI tag Product Scheme : तुमच्या शेतमालाल जीआय मानांकन आहे? मग 'या' योजना तुमच्यासाठी

GI tag Product Scheme : तुमच्या शेतमालाल जीआय मानांकन आहे? मग 'या' योजना तुमच्यासाठी

राज्याच्या पणन मंडळाकडून जीआय मानांकनप्राप्त उत्पादनाच्या विक्रीसाठी या योजना राबवण्यात येत आहेत.

राज्याच्या पणन मंडळाकडून जीआय मानांकनप्राप्त उत्पादनाच्या विक्रीसाठी या योजना राबवण्यात येत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यात विविध प्रदेशानुसार तेथील प्रसिद्ध असलेल्या मालाला भौगौलिक चिन्हांकन मिळत असते. भौगौलिक चिन्हांकन मिळालेल्या मालाला विशेष महत्त्व समजले जाते. तर त्या मालाचा दर्जाही वाढतो आणि विक्रीसही मदत होत असते. महाराष्ट्रामध्ये साधारण २८ शेतमालाला जीआय मानांकन मिळालेले आहे. 

ज्या शेतमालाला, फळपिकांना, भाजीपाला पिके, मसाला पिके, कृषीपिके आणि प्रक्रिया उत्पादनांना जीआय मानांकन मिळालेले आहे अशा उत्पादनाच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना माल विक्रीत प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून काही योजना राबवण्यात येत आहेत.

योजनांचे उद्दिष्टे
भौगोलिक चिन्हांकन/मानांकन संदर्भातील माहिती सर्व घटकापर्यंत पोहोचवणे, उत्पादकांना नोंदणीसाठी प्रोत्साहीत करणे व नोंदणीचे आवश्यकते बाबतची माहिती उत्पादकांना देणे व भौगोलिक मानांकन उत्पादने थेट ग्राहकांपर्यत पोहोचविणे. यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून राज्यातील भौगोलिक मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार, प्रसिद्धी, नोंदणी व मुल्यसाखळी विकसीत करणेसाठी ४ स्वतंत्र अर्थसहाय्याच्या योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.

योजना क्र. १

भौगोलिक चिन्हांकन / मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांचे प्रचार व प्रसिद्धीसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनासाठी अनुदान योजना
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणाऱ्या संस्था.
लाभाचे स्वरूपः एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजनासाठी कमाल मर्यादा रूपये रू. १०,०००/- प्रति प्रशिक्षण (किमान १०० शेतकऱ्यांसाठी)

योजना क्र. २ 

भौगोलीक चिन्हांकन / मानांकन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता नोंदणी शुल्कासाठी अनुदान
योजना लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.
लाभाचे स्वरुप : भौगालिक मानांकन नोंदणीसाठी प्रती शेतकरी रु. २००/- अनुदान संबंधित कृषि उत्पादनाचे मालकी असणाऱ्या संस्थेला देण्यात येईल.

योजना क्र. ३

भौगोलिक चिन्हांकन / मानांकन नोंदणी प्राप्त उत्पादनांचे मुल्यसाखळी विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान योजना
उद्देशः भौगोलिक मानांकन नोंदणीकृत नैसर्गिक गुणवत्ता असलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचवणे, भेसळीला प्रतिबंध करणे, विशिष्ट भौगौलिक क्षेत्रात उत्पादीत होणारी उत्पादने चिन्हासह विक्री करणेसाठी बाजार विकासा करीता (सुयोग्य पॅकींग, लेबलिंग, ब्रँडींग, बारकोड, वेबसाईट विकास इ.) अर्थसहाय्य करणे.
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.
लाभाचे स्वरुपः उत्पादनांच्या बाजार विकासा करीता येणाऱ्या खर्चाच्या ५०% अथवा जास्तीत जास्त रक्कम रु.३,००,०००/- पर्यंत अर्थसहाय्य संबंधित कृषि उत्पादनाचे मालकी असणाऱ्या संस्थेला देण्यात येईल.

योजना क्र. ४

कृषि पणन मंडळाच्या फळे व कृषिमाल महोत्सव उपक्रमामधील भौगोलिक चिन्हांकन / मानांकन उत्पादनांच्या स्टॉलकरीता अर्थसहाय्य योजना
लाभार्थी : भौगोलिक मानांकन प्राप्त उत्पादनांची मालकी असणारी संस्था.

स्वरुप : प्रति स्टॉल रु. ३०००/- अर्थसहाय्य

Web Title: GI tag Product Scheme Is your agricultural product GI rated msamb scheme for agriculture product selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.