Lokmat Agro >शेतशिवार > Goat farming : शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वाळणे गरजेचे; शेळी ही एक चालते बोलते एटीएम

Goat farming : शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वाळणे गरजेचे; शेळी ही एक चालते बोलते एटीएम

Goat farming : Goat Farming is ATM for farmers | Goat farming : शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वाळणे गरजेचे; शेळी ही एक चालते बोलते एटीएम

Goat farming : शेतकऱ्यांनी शेळीपालनाकडे वाळणे गरजेचे; शेळी ही एक चालते बोलते एटीएम

छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड येथे पाच दिवशीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Goat farming)

छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड येथे पाच दिवशीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Goat farming)

शेअर :

Join us
Join usNext

Goat farming : शेळीपालनामध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळ्यांना गोठ्या मध्येच पुरवला जातो. अर्ध बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते त्यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड येथे पाच दिवशीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम ३० सप्टेंबर ते  ४ ऑक्टोबर या पाच दिवसात संपन्न झाला. यात एकूण ३०  शेतकरी बंधु-भगिनींनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्रचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी शेळीपालन व्यवस्थापन करून चांगले उद्योजक व्हावेत,अशी आशा व्यक्त केली.

पाच दिवसीय व्यावसायिक शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ. अनिता जिंतुरकर या होत्या. कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. 
शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारणत: एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये १० शेळ्या जगू शकतात. 

त्यामुळे अल्प भुधारकांसाठी हा व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे , शेळयांच्या आरोग्याचे , निवाऱ्याचे व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त तसेच अर्ध बंदिस्त या प्रकारे भारतामध्ये हा व्यवसाय केला जातो. 

बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळ्यांना गोठ्या मध्येच पुरवला जातो. अर्ध बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळ्या चरण्यासाठी काही वेळ बाहेर मोकळ्या सोडल्या जातात. यामध्ये शेळयांना चाऱ्याबरोबर शेतातील व बांधावरील बऱ्याच वनस्पती मिळतात. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य खूप चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते त्यामुळे हा प्रकार जास्त फायदेशीर आहे. 

तसेच हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो. काही जातीच्या शेळ्या या १४ महिन्यामध्ये दोनदा वितात यामुळे अधिक उत्पन्न मिळते. शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देण्याची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे. पैशाची गरज भासल्यास शेळ्या विकुन तो उभा करता येऊ शकतो.

शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते. यांना खाण्यास निकृष्ट प्रतिचाही चारा चालतो. त्याचे रूपांतर त्या दूध व मांसात करतात.
त्यांचे वेत लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते. लहान चणीच्या असल्याने त्यांना निवाऱ्यास जागा कमी लागते. त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते. बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे.

त्यांचे शिंगापासून व खुरापासून पदार्थ बनतात. त्यांचे मांस चविष्ट असते. याचे  महत्त्व सांगून आहार, निवारा व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. शेळीपालनचे अर्थ शास्त्र सांगते की शेळीपालन हे शेतकऱ्यांसाठी चालते बोलते ATM आहे . 

या प्रशिक्षणात अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी पालन, पडेगाव येथे प्रक्षेत्र भेट देण्यात आली. गिलबीले, डुक्करे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा.गीता यादव, डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजुला भावर यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात शेळीपालकांबरोबर वकिल व इलेक्टीशन यांनीही सहभाग घेतला. या प्रशिक्षणात जयदीप बनसोडे व जयदेव सिंगल यांचे सहकार्य लाभले. 

Web Title: Goat farming : Goat Farming is ATM for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.