इटली येथील डॉ. गुइडो लोरिया आणि डॉ. रॉबर्टो पुलेओ, डब्ल्यूओएएच संक्रमक अगालॅक्टिया संदर्भ प्रयोगशाळा, आयझेडएस, पालेर्मो, इटली यांच्यासोबत डॉ. एन. व्ही. कुरकुरे, संशोधन संचालक महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर या तज्ज्ञांनी वाई येथील 'सुंबरान शेळी' प्रकल्पास भेट दिली.
या भेटीदरम्यान 'सुंबरान'चे संचालक पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी भारतातील आणि इटली देशातील शेळीपालन संदर्भातील भविष्यातील संधी आणि आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सुंबरान शेळी प्रकल्पामधील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा आढावा, या भेटीत घेण्यात आला.
येथील बंदिस्त प्रकल्पातील सशक्त आफ्रिकन बोअर शेळ्या पाहिल्यानंतर परदेशी पाहुणे विशेष भारावून गेले चव्हाण यांनी शेळ्या व मेंढ्यांच्या ठेवलेल्या सर्व नोंदीचे तसेच शेळ्यांसाठी बेडरूम आणि शेळ्यांची डायनिंग रूम, या संकल्पनेचेही विशेष कौतुक केले.
भारत आणि इटली या देशांतील शेळीपालनातील आव्हाने जवळपास सारखीच आहेत, असे निरीक्षण परदेशी पाहुण्यांनी व्यक्त केले. पारंपरिक शेळी-मेंढी पालनातील खडतर आयुष्य जगताना, मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागत आहे.
इटली देशांमध्ये दूध उत्पादनासाठी प्राधान्याने शेळीपालन केले जाते. भारत आणि इटली देशांतील शेळी-मेंढीमधील विविध आजारांमध्ये संशोधनातील सहकार्यासाठी शिरवळ पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील डॉ. विठ्ठल धायगुडे विशेष प्रयत्नशील आहेत.
'सुंबरान शेळी' प्रकल्पातील नावीन्यपूर्ण संकल्पना नवोदित शेळी पालकांसाठी पथदर्शक असणार आहेत, अशी 'माफसू'चे संचालक डॉ. करकरे यांनी दिल्या.
अधिक वाचा: Chara Depo राज्यात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा चारा; शासनाने घेतला हा मोठा निर्णय