Join us

Gobargas : पशुधनात घट झाल्याचा परिणाम; गोबर गॅसकडे दुर्लक्ष करत नागरिकांचा आधुनिक गॅसकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 2:47 PM

गोबरगॅसचा वापर करून दैनंदिन जीवनामध्ये इंधन म्हणून स्वयंपाकघरात त्याचा वापर सर्रास होत असे. तसेच गॅसनिर्मिती झाल्यानंतर उरलेल्या शेणापासून चांगल्या प्रकारचे शेणखतदेखील मिळत असे. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गोबर गॅस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

एकेकाळी यवतमाल जिल्ह्यातील वणी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गाव खेड्यातील नागरिकांकडे मुबलक प्रमाणात गुरेढोरे असत. या पशुधनापासून मिळणाऱ्या विष्ठेपासून तयार होणारा गोबरगॅस गावखेड्यात प्रत्येक घरी पाहायला मिळायचा.

गोबरगॅसचा वापर करून दैनंदिन जीवनामध्ये इंधन म्हणून स्वयंपाकघरात त्याचा वापर सर्रास होत असे. तसेच गॅसनिर्मिती झाल्यानंतर उरलेल्या शेणापासून चांगल्या प्रकारचे शेणखतदेखील मिळत असे. मात्र, आता ग्रामीण भागातील पशुधन मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गोबर गॅस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील पशुधन कमी झाले आहे. पूर्वी पारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी एक असलेल्या गोबरगॅसची बायोगॅस संकल्पना ग्रामीण भागात उपयुक्त ठरत होती. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायासाठी पूर्वी गुरेढोरे मोठ्या प्रमाणात पाळली जात होती.

गुराढोरांमुळे शेणखत मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबरगॅस पाहायला मिळत होते. ग्रामीण भागातील कुटुंबासाठी तर गोबरगॅस वरदान ठरत होते. परंतु, पशुधन घटले व शेण आणि शेणखत मिळणे दुर्लभ झाल्याने एकेकाळी महत्त्वाचा घटक असलेले गोबरगॅस आता ग्रामीण भागातून कालबाह्य झाला आहे.

शेतीसोबतच जोडधंदा म्हणून शेतकरी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायासाठी पूर्वी गुरेढोरे मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. गुराढोरांमुळे इंधन मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबर गॅस पाहायला मिळत होते. प्रत्येक गावात गाईसाठी राखीव गायरान होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडे गोधन मुबलक असायचे.

मात्र, गेल्या १० वर्षात गायरान जमिनीवर अतिक्रमण झाले. परिणामी चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी गाई विकून टाकल्या आहेत. परिणामी शेतीचे अन् मातीचे गणित बिघडले.

गोबरगॅस ग्रामीण भागासाठी उपयुक्त

पूर्वी शेतकरी शेती कसण्यासाठी आणि शेतीपूरक दुग्ध व्यवसाय म्हणून शेतकरी कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायासाठी गुरेढोरे मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. गुराढोरांमुळे इंधन मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबर गॅस पाहायला मिळत होते. हल्ली शेती यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने होत असल्याने पशुधन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच एकेकाळचा गोबरगॅस ही संकल्पनाच नामशेष होत असल्याचे पाहायला मिळते.

हेही वाचा : Amla Health Benefits : बलवर्धक आवळा खा; रोगप्रतिकारकशक्ती वाढवा

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीदुग्धव्यवसायग्रामीण विकासविदर्भशेती