Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात 13 ते 17 डिसेंबरला 'किसान' प्रदर्शनाचे आयोजन

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात 13 ते 17 डिसेंबरला 'किसान' प्रदर्शनाचे आयोजन

golden opportunity for farmers Organization of Kisan exhibition from 13th to 17th December Pune moshi international exibition centre | शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात 13 ते 17 डिसेंबरला 'किसान' प्रदर्शनाचे आयोजन

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात 13 ते 17 डिसेंबरला 'किसान' प्रदर्शनाचे आयोजन

'किसान'कडून मागच्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची आणि प्रयोगांची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते.

'किसान'कडून मागच्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची आणि प्रयोगांची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांनी नवे तंत्रज्ञान, नवे प्रयोग अवगत केले पाहिजेत.  आधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानामुळेशेती क्षेत्रात मोठी प्रगती होत असते. पण अनेक प्रयोग, प्रकल्प, तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. त्यासाठी 'किसान'कडून मागच्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची आणि प्रयोगांची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येत असते. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरते. यंदाही हे प्रदर्शन पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

'किसान' शेतकरी प्रदर्शन हे १३ ते १७ डिसेंबर या काळात होणार असून पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र, मोशी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी जगभरातील नवे आणि वेगवेगळे तंत्रज्ञान, मानवरहित शेती तंत्रज्ञान, नवे यंत्र, शेतीपूरक व्यवसाय, शेती क्षेत्रातील प्रक्रिया उद्योग, विपणन व्यवस्था, निर्यात व्यवस्था, शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग पाहण्याची आणि खते, बियाणे, किटकनाशके, शेती निविष्ठा कंपनीच्या थेट महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

दरम्यान, दरवर्षी होणाऱ्या या प्रदर्शनाला लाखो शेतकरी आणि नागरिक हजेरी लावत असतात. या प्रदर्शनामध्ये देशभरातील आणि जगभरातील शेती क्षेत्रांत काम करणाऱ्या महत्त्वाच्या संस्था सहभागी होत असातत. यामध्ये ते त्यांचे उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करत असतात. यामध्ये यंत्राचे, प्रयोगाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येते. हे पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत असते. येथे अनेक शेतकऱ्यांच्या, त्यांच्या प्रयोगाच्या ओळखीही होत असतात. तर भविष्यात येऊ घातलेल्या डिजीटल अॅग्रिकल्चरसाठी हे प्रदर्शन खूप महत्त्वाचे आहे.

'लोकमत ॲग्रो'शी जोडण्याची संधी
'किसान' प्रदर्शनामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला किंवा नागरिकाला लोकमत ॲग्रो या डिजीटल माध्यमाशी जोडण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक सल्ला, शेतीशी संबंधित अपडेट्स, बातम्या, योजनांची माहिती अगदी सोप्या भाषेत आणि मोफत मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीचे ध्येय समोर ठेवून लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून भविष्यात शेतकऱ्यांना तज्ज्ञ मंडळींकडून प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी लोकमत ॲग्रोशी जोडणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Web Title: golden opportunity for farmers Organization of Kisan exhibition from 13th to 17th December Pune moshi international exibition centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.