Lokmat Agro >शेतशिवार > आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुवर्णसंधी निर्यातक्षम आंबा पिकाची मँगोनेटव्‍दारे हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी सुरु

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुवर्णसंधी निर्यातक्षम आंबा पिकाची मँगोनेटव्‍दारे हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी सुरु

Golden opportunity for mango farmers Registration of exportable mango crops on Hortinet system through Mangonet started | आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुवर्णसंधी निर्यातक्षम आंबा पिकाची मँगोनेटव्‍दारे हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी सुरु

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुवर्णसंधी निर्यातक्षम आंबा पिकाची मँगोनेटव्‍दारे हॉर्टीनेट प्रणालीवर नोंदणी सुरु

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या Mangonet मँगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्‍ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या Mangonet मँगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्‍ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्‍या मँगोनेट प्रणालीव्‍दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्‍ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे.

निर्यातक्षम आंबा बागाची नोंदणी करीता मॅगोनेट ही ऑनलाईन प्रणाली दिनांक १ नोव्हेंबर, २०२४ पासून कार्यान्वित करण्‍यात आलेली आहे.

निर्यातक्षम बागांच्‍या नोंदणी करीता Apeda अपेडाने फार्म रजिस्‍टेशन मोबाईल अॅप उपलब्‍ध केलेले आहे. सदर अॅप अपेडाच्या वेबसाईटवरुन तसेच गुगल प्ले स्टोअर वरुन करता येईल.

तरी सर्व आंबा बागायतदारांना विनंती करण्‍यात येते की सन २०२४-२५ मध्‍ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधून त्‍वरीत अर्ज करण्‍यात यावेत.

नव्‍याने नोंदणीकरणेसाठी विहीत नमुन्‍यातील अर्ज, ७/१२, ८अ, बागेचा नकाशा इत्यादी कागदपत्राची आवश्‍यकता आहे. मँगोनेटव्‍दारे नोंदणी करण्‍याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२४ अशी आहे.

निर्यातक्षम बागांची वेळेत नोंदणी करणे करीता संबंधित जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्‍याचे आवाहन डॉ. कैलास मोते, मा. संचालक फलोत्‍पादन यांचेकडून करण्‍यात आले आहे.

Web Title: Golden opportunity for mango farmers Registration of exportable mango crops on Hortinet system through Mangonet started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.