Lokmat Agro >शेतशिवार > दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी

दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी

Good news for drought-stricken farmers; This amount of funds will be available for Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme | दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी

दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी

सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरीता रू. १६०.०० कोटी निधी वितरीत होणार आहे.

सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरीता रू. १६०.०० कोटी निधी वितरीत होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यात येते. 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.

कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरीता रु. १४० कोटी व वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता रु. २० कोटी असा एकूण रु. १६० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन २०२३-२४ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता रु. १६०.०० कोटी (रुपये एकशे साठ कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे.

योजनेंतर्गत घटकनिहाय वितरण पुढीलप्रमाणे

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत मंजूर घटकवितरीत निधी (रुपये कोटीत)
अ. सूक्ष्म सिंचन {राष्ट्रीय कृषि विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान}१४०.००
ब. वैयक्तिक शेततळे२०.००
एकूण१६०.००

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा केली जाईल.

Web Title: Good news for drought-stricken farmers; This amount of funds will be available for Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.