Join us

दुष्काळी शेतकऱ्यांसाठी खुशखबर; मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेसाठी मिळणार इतका निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 3:31 PM

सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरीता रू. १६०.०० कोटी निधी वितरीत होणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यात येते. 

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.

कृषि आयुक्तालयाकडून प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरीता रु. १४० कोटी व वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता रु. २० कोटी असा एकूण रु. १६० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

सन २०२३-२४ या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे या घटकाकरीता रु. १६०.०० कोटी (रुपये एकशे साठ कोटी फक्त) निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात येत आहे.

योजनेंतर्गत घटकनिहाय वितरण पुढीलप्रमाणे

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत मंजूर घटकवितरीत निधी (रुपये कोटीत)
अ. सूक्ष्म सिंचन {राष्ट्रीय कृषि विकास योजना (प्रति थेंब अधिक पीक) घटकांतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान}१४०.००
ब. वैयक्तिक शेततळे२०.००
एकूण१६०.००

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा केली जाईल.

टॅग्स :शेतकरीशेतीठिबक सिंचनमुख्यमंत्रीराज्य सरकारसरकारी योजना