राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या १८ वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठांपैकीराहुरी कृषी विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर सर्वात जास्त वाण प्रसारित झाले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाला या निमित्ताने यश प्राप्त झाले आहे.
प्रसारित केलेल्या पिकांचे वाणभात - फुले कोलममका - फुले उमेद व फुले चॅम्पियनज्वारी - फुले पूर्वाकरडई - फुले भूमीतूर - फुले पल्लवीमूग - फुले सुवर्णउडीद - फुले राजनराजमा - फुले विराजऊस - फुले १५०१२घेवडा - फुले श्रावणीगहू - फुले अनुरागकापूस - फुले शुभ्राटोमॅटो - फुले केसरीचेरी टोमॅटो - फुले जयश्रीघोसाळे - फुले कोमलवाल - फुले सुवर्णमेथी - फुले कस्तुरी
सन २०२४ या वर्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्वांत जास्त वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाले आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवाची बाब आहे. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकरीभिमुख संशोधन करीत आहेत. - डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी