Join us

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 9:10 AM

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्याकरिता देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज करण्यात आली आहे. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ता सुद्धा वाढविण्यात आला आहे.

विविध कृषी पुरस्कारांची संख्या, पुरस्काराच्या सुधारित रकमा पुरस्कारांची संख्या पुढीलप्रमाणे

पुरस्काराचे नावपुरस्कारांची संख्यापूर्वीची रक्कमसुधारित रक्कम
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार७५,०००/-३,००,०००/-
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार५०,०००/-२,००,०००/-
जिजामाता कृषी भूषण पुरस्कार५०,०००/-२,००,०००/-
कृषीभूषण (सेंद्रिय शेती)५०,०००/-२,००,०००/-
उद्यान पंडित५०,०००/-२,००,०००/-
वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार३०,०००/-१,२०,०००/-
युवा शेतकरी पुरस्कार३०,०००/-१,२०,०००/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट)३४११,०००/-४४,०००,/-
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट)०६११,०००/-४४,०००/-

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार १० जणांना तर उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार ४ जणांना देण्यात येईल. पुरस्कार विजेत्यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता दैनिक प्रवास भत्त्यात वाढ करण्यात आली असून प्रत्येक विजेत्याला १५ हजार रुपये भत्ता देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आलेला आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीराज्य सरकारसरकारधनंजय मुंडेअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस