Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Seed शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा हे सोयाबीनचे बियाणे २५ रुपयांनी स्वस्त

Soybean Seed शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा हे सोयाबीनचे बियाणे २५ रुपयांनी स्वस्त

Good news for farmers, this year soybean seeds are cheaper by Rs 25 | Soybean Seed शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा हे सोयाबीनचे बियाणे २५ रुपयांनी स्वस्त

Soybean Seed शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा हे सोयाबीनचे बियाणे २५ रुपयांनी स्वस्त

यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) देण्यात येणाऱ्या बियाण्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांनी कमी झाला आहे.

यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) देण्यात येणाऱ्या बियाण्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांनी कमी झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) देण्यात येणाऱ्या बियाण्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांनी कमी झाला आहे. मात्र, भाताच्या विविध वाणांच्या दरात सरासरी प्रतिकिलो १० रुपयांची वाढ झाली आहे.

'महाबीज'नेसोयाबीनभाताचे ३१०० क्विंटल बियाणे विक्रेत्यांकडे पोहोच केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असून, वळीव पावसामुळे मशागतीच्या कामांना गती आली आहे. येत्या आठ दिवसांत खरीप पेरण्यांची धांदल उडणार आहे.

त्यादृष्टीने 'महाबीज' व खासगी विक्रेत्यांकडे बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यासाठी या हंगामात ३७ हजार ७७१ क्विंटल बियाण्याची गरज आहे. त्यात भाताची २३ हजार ९४०, तर सोयाबीनची ११ हजार २६१ क्विंटलची मागणी आहे.

त्यापैकी खासगी विक्रेत्यांकडून जास्त पुरवठा केला जातो. 'महाबीज'ने आतापर्यंत भाताचे १३०० क्विंटल, तर सोयाबीनचे १८०० क्विंटल बियाणे जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडे पाठविले आहे. 

९८% प्रमाणित बियाणेच विक्रीस
महाबीजतर्फे शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली जाते. आष्टा येथे प्रक्रिया केंद्र असून, तिथे ९८ टक्के प्रमाणित असलेले बियाणेच विक्रीस पाठवले जाते.

भातांच्या बियाण्यांचे दर
इंद्रायणी: ६५ 
रत्नागिरी: ५६ 
जया: ५१
कर्जत: ६०

सोयाबीन (नवीन) : ८७
सोयाबीन (जुने) : ८५

यंदा ४५० हेक्टरवर बीजोत्पादन
महाबीज'ने यंदा ४५० हेक्टरवर बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविला आहे. यामध्ये इंदायणी', भोगावती', 'फुले समृद्धी', 'को-५१', 'आरटीएन-१' तर पन्हाळ्यात नागली घेतली जाणार आहे.

शासन बियाण्यासाठी अनुदान देणार का?
गेल्यावर्षी शासनाने सोयाबीनच्या बियाण्याला ४५ टक्के अनुदान दिले होते. यंदा मात्र अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही.

महाबीजकडे प्रमाणित केलेले नोंदणीप्रमाणे भात व सोयाबीनचे बियाणे विक्रेत्यांकडे पोहोचले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे बीजोत्पादनाचे प्लॉटही केले जाणार आहेत. - अभय अष्टणकर (जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, कोल्हापूर

अधिक वाचा: सोयाबीनचं घरचं बियाणं पेरताय; अशी करा उगवण क्षमता चाचणी

Web Title: Good news for farmers, this year soybean seeds are cheaper by Rs 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.