Join us

आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 11:49 AM

हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील ३२ हजार ४४९ शेतकरी फळपीक विम्याच्या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार, याबाबत मात्र प्रतीक्षा आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना शासनाने जाहीर केली असून आंबा, काजू पिकाचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. परतावा जाहीर करण्यासही उशीर झाला आहे.

आंबा ६९ टक्केजिल्ह्यातील सहभागी ३० हजार ४ आंबा बागायदारांपैकी २६ हजार ९६९ शेतकरी पात्र ठरले असून ७० कोटी चार लाख २३ हजार ७०८ रुपये परतावा रक्कम जाहीर झाली आहे. टक्केवारी ६९.०६ टक्के आहे.

काजू १२६ टक्केकाजूसाठी प्रथमच भरघोस परतावा जाहीर झाला आहे. सहभागी ६,८१४ शेतकऱ्यांपैकी ५,४८० शेतकरी पात्र ठरले. आठ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा रक्कम असून टक्केवारी १२६ टक्के आहे.

परताव्यात घटगतवर्षीच्या तुलनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी परताव्याची रक्कम घटली आहे- ७,८३६ लाभार्थी वाढले; परंतु तुलनेने दोन कोटी ३९ लाख ८,४४४ रुपये परतावा रक्कम कमी झाली आहे.

एकूण शेतकरी - ३६,८१८एकूण क्षेत्र (हे.) - २०,६९४.७१विमा संरक्षित रक्कम - २,७२८,०६०,४४४

शेतकरी प्रतीक्षेतहवामानातील बदलामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी फळपीक विमा योजनेत सहभागी होतात. परतावा जाहीर करण्यासाठी विलंब झाला, शासनाकडून विमा हप्त्याचे पैसे जमा झाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे मिळणार आहेत.

हवामानातील बदलाचा पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. काही महसूल मंडळांतील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्यामुळे बागायतदारांचे नुकसान होते. यावर उपाययोजना व्हावी. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :पीक विमाआंबापीकफलोत्पादनरत्नागिरीशेतकरीशेतीसरकारकोकण