वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजने अंतर्गत विकसित केलेली उझीमाशी नियंत्रण प्रयोगशाळेचे उदघाटन नुकतेच रोजी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रयोगशाळेत निसोलायनेक्स थायमस परोपजीवी किटक निर्मिती करण्यात येणार असून रेशीम किडीवरील उपद्रवी किडी उझी माशीचे जैविक पध्दतीने नियंत्रण करण्यास मदत होते.
सन २०२१-२२ पर्यंत मराठवाडयातील बहुतांश जिल्हयात उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकयांचे ३० ते ५० टक्के पर्यंत नुकसान झाले. यामुळे काही शेतकयांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली. रेशीम उत्पादक शेतकयांची अडचन लक्षात घेवून परभणी कृषि विद्यापीठाने उझी माशीचे एकात्मिक पध्दतिने नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून कांही शेतकयांना उझीनाश पावडर धुरळणी, उझी ट्रॅप सापळे लावण्याची शिफारस केली.याचा चांगला फायदा झाला, त्यामुळे विद्यापीठाने सदर प्रयोगशाळेची सुरूवात केली आहे. रेशीम उद्योजक शेतकयांकरिता निसोलायनेक्स थायमस या मित्रकिडीचे एनटी-पाऊच निर्मीती राज्यात प्रथमच विद्यापीठात सुरू करण्यात आली आहे.
परोपजीवी कीड उझीमाशीबद्दल
रेशीम किटकावरील अत्यंत उपद्रवी परोपजीवी किड म्हणजे उझीमाशी (एक्झोरिष्टा बॉम्बीक्स) होय. देशात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगाल या रेशीम उत्पादन करनाया पारंपारीक राज्यात या किडीमुळे रेशीम कोष पीकाचे २० टक्के नुकसान होते व उत्पादनात घट येते. जपान देशात सन १८६८ मध्ये ही कीड सर्वप्रथम आढळली आणि तेथील रेशीम उद्योग धोक्यात आला.
भारतात सन १८९६ मध्ये पश्चिम बंगाल राज्यात प्रथम उझी माशीचा रेशीम किटकावर प्रादुर्भाव आढळून आला. १९८० च्या दशकात कांही व्यापाऱ्यामार्फत ही कीड कर्नाटक राज्याच्या कोष मार्केट मध्ये आणल्यामुळे प्रादुर्भाव वाढला आणि दक्षिनात्य आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यात उझी माशीचा फैलाव झाला. सन २०१८ मध्ये मराठवाडयातील लातूर, उस्मानाबाद, परभणी अशा कांही जिल्हयात उझी माशीचा प्रादुर्भाव प्रथम आढळला. सन २०२१-२२ पर्यंत मराठवाडयातील बहुतांश जिल्हयात उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे शेतकयांचे ३० ते ५० टक्के पर्यंत नुकसान झाले. काही शेतकयांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली.
शेतकयांची अडचण लक्षात घेवून परभणी कृषि विद्यापीठाने मागील २-३ वर्षात या प्रश्नाचे गांभिर्य ओळखून उझी माशीचे एकात्मिक पध्दतिने नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून कांही शेतकयांना उझीनाश पावडर धुरळणी, उझी ट्रॅप सापळे लावण्याची शिफारस केली. आणि आता संपुर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर (कर्नाटक) यांच्या सहकार्याने उझीमाशीचे संपुर्ण नियंत्रण करण्यासाठीचे एन टी-पाऊच निर्मीती विद्यापीठात सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी दिली.
उझी माशी नियंत्रणाकरिता रेशीम उत्पादक शेतकरी बांधवांना १०० अंडिपुंजासाठी २ पाउुच लावण्याची शिफारस करण्यात आली असुन अधिक माहिती करिता डॉ. संजोग बोकण ९९२१७५२०० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.यांनी रेशीम शेतीकडे पाठ फिरवली. शेतकयांची अडचन लक्षात घेवून परभणी कृषि विद्यापीठाने मागील २-३ वर्षात या प्रश्नाचे गांभिर्य ओळखून उझी माशीचे एकात्मिक पध्दतिने नियंत्रण करण्याचा एक भाग म्हणून कांही शेतकयांना उझीनाश पावडर धुरळणी, उझी ट्रॅप सापळे लावण्याची शिफारस केली.
आता संपुर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हैसूर (कर्नाटक) यांच्या सहकार्याने उझीमाशीचे संपुर्ण नियंत्रण करण्यासाठीचे एन टी-पाऊच निर्मीती विद्यापीठात सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी दिली. उझी माशी नियंत्रणाकरिता रेशीम उत्पादक शेतकरी बांधवांना १०० अंडिपुंजासाठी २ पाऊच लावण्याची शिफारस करण्यात आली असुन अधिक माहिती करिता डॉ. संजोग बोकण ९९२१७५२०० या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.