महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा ठाणे व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रगती कॉलेज डोंबिवली येथे जिल्हास्तरीय रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी माननीय श्री. दीपकजी कुटे साहेब व रोटरी क्लब ऑफ इंडिया डोंबिवली यांचे सदस्य व कृषी विभागाचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाचही तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाज्या मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत कार्यरत प्रकल्पातील उत्पादित केलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन स्थळी विक्री करण्यात आली. सदर कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त स्टॉल धारकांनी नोंदणी करून मोठ्या प्रमाणात विक्री केली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन करताना कृषी विभागातील कृषी उपसंचालक माननीय श्री. दशरथजी घोलप साहेब. प्रकल्प उपसंचालक आत्मा माननीय सौ. मनाली तांबडे मॅडम, सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व आत्मा यंत्रणेचे सर्व तालुक्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.