राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने हि योजना सुरु केली. “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना” ही योजना सन २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. सन २००९-१० पासून सदर योजनेचे नामाभिधान “शेतकरी जनता अपघात विमा योजना” असे करण्यात आले. सन २०१५-१६ पासून सदर योजनेचे नामाभिधान “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” असे करण्यात आले.
योजनेचे स्वरुपशासन निर्णय दिनांक १९ एप्रिल २०२३ सदर योजनेत राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा, अविवाहीत मुलगी) यांचा समावेश आहे.अपघातग्रस्त व्यक्तीची वयोमर्यादा १० ते ७५ वर्षे.
योजनेतंर्गत देण्यात येणारी मदत अपघाती मृत्यू: रु. २.०० लाखदोन डोळे/दोन अवयव निकामी होणे: रु. २.०० लाख एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे: रु. १.०० लाख
नवीन योजनेची ठळक वैशिष्ट्ये- पूर्वी शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरायची. आणि विमा कंपनी मग प्रस्ताव तपासून मान्य करायची, मात्र यात कधी कधी १ ते २ वर्षाचा देखील विलंब व्हायचा. जुजबी त्रुटी काढून प्रस्ताव परत करणे, अनावश्यक त्रुटी काढून प्रस्ताव नाकारणे अशा बाबी व्हायच्या. यामुळे अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला तत्काळ दिलासा देण्याचा हेतू साध्य करताना अडचणी यायच्या. म्हणून आता अपघात ग्रस्त कुटुंबाला तत्काळ विहित मदत देण्याच्या हेतूने प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखालील समितीला दिले आहेत.- अपघात घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सादर करायचा आहे. त्या नंतर त्याची तपासणी करून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुका स्तरीय समितीने करावयाची आहे. - अपघातात आता बाळंतपनातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे . - वारसाच्या खात्यात रक्कम DBT द्वारे जमा करायची आहे.
विमा संरक्षणामध्ये समाविष्ट बाबी१) रस्ता/रेल्वे अपघात २) पाण्यात बुडून मृत्यू३) वीज पडून४) जंतुनाशक हाताळताना/अन्य कारणांमुळे विषबाधा५) वीजेचा शॉक लागून६) खून७) उंचावरुन पडून मृत्यू८) सर्पदंश९) नक्षलवाद्याकडून झालेली हत्या१०) जनावराने खाल्यामुळे/चावण्यामुळे - मृत्यू किंवा अपंगत्व११) दंगल१२) बाळंतपणातील मृत्यू१३) अन्य कोणतेही अपघात
विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी१) नैसर्गिक मृत्यू (हृद्यविकार, पक्षघात)२) विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व/मृत्यू३) आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न किंवा जाणीपूर्वक स्वत:ला इजा करुन घेणे४) गुन्हाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात५) अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात६) भ्रमिष्टपणा७) शरीरातील रक्तस्त्राव८) मोटार शर्यतीतील अपघात९) युध्द१०) सैन्यातील नोकरी ११) जवळच्या लाभधारकाकडून खून
वारसदार१) अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती २) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी ३) अपघातग्रस्ताची आई४) अपघातग्रस्ताचा मुलगा ५) अपघातग्रस्ताचे वडील ६) अपघातग्रस्ताची सून ७) अन्य कायदेशीर वारसदार
सानुग्रह अनुदान योजनेनूसार विमा दावे सादर करण्याची पध्दती- अपघातग्रस्त शेतकरी/शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे ३० दिवसाच्या आंत सादर करेल.- सदर विमा दाव्यांची तालुका कृषि अधिकारी यांनी प्रस्तावांची छाननी करुन पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांचेकडे सादर करेल.- तहसीलदार यांनी ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेऊन संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारास अनुदान अदा करण्यात येईल.- तालुका समितीने घेतेलेला निर्णय शेतकऱ्यांस/वारसदारास मान्य नसल्यास संबंधित शेतकरी/वारसदार जिल्हास्तरावरील अपिलिय समितीकडे अपील सादर करू शकतात.
अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे- ७/१२ उतारा- मृत्यूचा दाखला- गांवकामगार तलाठ्याकडील गाव नमना नं.६-क नूसार मंजूर झालेली वारसाची नोंद- शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला- आधारकार्ड/निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे- प्रथम माहिती अहवाल/स्थळ पंचनामा/पोलीस पाटील माहिती अहवाल- अपघाताच्या स्वरुपानूसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची- कागदपत्रे
विनयकुमार आवटेकृषी सहसंचालक, (वि.प्र-१), पुणे-५avinaykumar.30@gmail.com