Join us

अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ४ कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:14 IST

नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत "अवेळी" पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने मंजूरी दिली आहे.

नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत "अवेळी" पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.४२९.३० लक्ष (रूपये चार कोटी एकोणतीस लक्ष तीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

नोव्हेंबर, २०२४ ते डिसेंबर, २०२४ मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशिर्षनिहाय तपशिलअ) कोकण विभाग (कालावधी - नोव्हेंबर २०२४ | प्रस्तावाचा दिनांक: १६.०१.२०२५)

जिल्हाबाधित शेतकरी संख्याबाधित क्षेत्र (हेक्टर)निधी (रु.लक्ष)
रत्नागिरी५३६.४१.०४
सिंधुदुर्ग४४६६६.०७९.८
एकूण४९९७२.४७१०.८४

अ) नाशिक विभाग (कालावधी - डिसेंबर २०२४ | प्रस्तावाचा दिनांक: २०.०२.२०२५)

जिल्हाबाधित शेतकरी संख्याबाधित क्षेत्र (हेक्टर)निधी (रु.लक्ष)
नाशिक५२२२६७.५९६.१४
धुळे१२५२९३९.३१६७.१
जळगाव११४५१०२९१५५.२
एकूण२९१९२२३६४१८.५

वरील टेबलमध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुर्नविनियोजनाव्दारे तरतुद उपलब्ध करुन घेऊन यांनी हा निधी वितरित करावा.

DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करुन संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी.

चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.

शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०१.०१.२०२४ नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.

वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.

लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.

अधिक वाचा: मुलींचे वडील हयात असतानांही त्यांना शेतजमिनीत हिस्सा मिळू शकतो? काय आहे नियम; वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीपाऊसपीकराज्य सरकारसरकारकोकणनाशिकरत्नागिरीसिंधुदुर्गधुळेजळगाव