Lokmat Agro >शेतशिवार > देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर

देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर

Government will soon enact a new law for temple gift lands; Read in detail | देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर

देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर

Devsthan Jamini देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक निर्णय घेणार.

Devsthan Jamini देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक निर्णय घेणार.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या अहवालानंतर कायदा करण्याचे धोरण असल्याचे महसूलमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सदस्य गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

उत्तरात बावनकुळे यांनी सांगितले की, प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समितीत स्थानिक आणि देवस्थान व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींचा समावेश केला जाईल. देवस्थानाच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळाव्यात ही शासनाचीही भूमिका आहे.

दोन प्रकारचे इनाम
देवस्थान इनाम जमिनीचे दोन प्रकार असून, ज्या जमिनी देवस्थानला थेट दान करण्यात आल्या आहेत, अशा जमिनीला 'सॉइल ग्रँट' म्हणतात, तर ज्या जमिनीबाबत शेतसारा वसूल करण्याचे अधिकार देवस्थानांना दिले आहेत त्या जमिनींना रेव्हेन्यू ग्रँट' असे म्हणतात.

अधिक वाचा: मुलींचे वडील हयात असतानांही त्यांना शेतजमिनीत हिस्सा मिळू शकतो? काय आहे नियम; वाचा सविस्तर

Web Title: Government will soon enact a new law for temple gift lands; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.