Join us

देवस्थान इनाम जमिनींसाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:40 IST

Devsthan Jamini देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक निर्णय घेणार.

मुंबई : देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून, त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीच्या अहवालानंतर कायदा करण्याचे धोरण असल्याचे महसूलमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सदस्य गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

उत्तरात बावनकुळे यांनी सांगितले की, प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समितीत स्थानिक आणि देवस्थान व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींचा समावेश केला जाईल. देवस्थानाच्या जमिनी शेतकऱ्यांना मिळाव्यात ही शासनाचीही भूमिका आहे.

दोन प्रकारचे इनामदेवस्थान इनाम जमिनीचे दोन प्रकार असून, ज्या जमिनी देवस्थानला थेट दान करण्यात आल्या आहेत, अशा जमिनीला 'सॉइल ग्रँट' म्हणतात, तर ज्या जमिनीबाबत शेतसारा वसूल करण्याचे अधिकार देवस्थानांना दिले आहेत त्या जमिनींना रेव्हेन्यू ग्रँट' असे म्हणतात.

अधिक वाचा: मुलींचे वडील हयात असतानांही त्यांना शेतजमिनीत हिस्सा मिळू शकतो? काय आहे नियम; वाचा सविस्तर

टॅग्स :महसूल विभागराज्य सरकारसरकारचंद्रशेखर बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळेमंत्री