Join us

कृषी विद्यापीठांनाअधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 18, 2023 9:50 PM

कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्त्वाचे आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांच्या समस्या प्राधान्याने सोडवून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या.  राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक आज राजभवन येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

 या  बैठकीला  कृषी  विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे (व्यय) अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरुंचे वित्तीय अधिकार वाढवा 

विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांमध्ये बांधकाम करण्यासाठी तसेच यंत्रसामग्री खरेदीसाठी ठरवून दिलेली निधीची कमाल मर्यादा फार पूर्वी ठरविण्यात आली असून  कुलगुरुंचे वित्तीय अधिकार वाढवून देण्यासाठी शासन स्तरावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना  राज्यपालांनी या बैठकीत केल्या. राज्यपालांनी सर्व कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या अध्यापक तसेच बिगर शिक्षकांच्या पदांचा आढावा घेतला व रिक्त जागा भरण्याबाबत विद्यापीठ तसेच शासनातर्फे केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.

टॅग्स :रमेश बैसशेती क्षेत्रविद्यापीठसरकार