Lokmat Agro >शेतशिवार > राज्याचे कृषीमाल निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांचे पुण्यात निधन

राज्याचे कृषीमाल निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांचे पुण्यात निधन

Govind Hande State Agricultural Export Adviser passed away in Pune | राज्याचे कृषीमाल निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांचे पुण्यात निधन

राज्याचे कृषीमाल निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांचे पुण्यात निधन

त्यांचा कृषी विषयात गाढा अभ्यास होता.

त्यांचा कृषी विषयात गाढा अभ्यास होता.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे :  कृषी विभागातले चालते बोलते व्यासपीठ आणि सध्याचे सेवानिवृत्त कृषी उपसंचालक आणि कृषीमाल निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांचे आज पुण्यात निधन झाले. दुपारी साडेअकरा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोविंद हांडे हे मितभाषी स्वभावाचे, सर्वांना समजावून घेत, सामावून घेत काम करणारे आणि सहकार्य करणारे कृषी अधिकारी होते.

त्यांनी कृषी विभागामध्ये उल्लेखनीय काम केले. कृषी आयुक्तालयातील सांख्यिकी विभागात त्यांनी चांगले काम केले. कृषीमाल निर्यातीमध्ये वाढ होण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. कृषी निर्यातीमध्ये त्यांची कामगिरी पाहून शासनाने राज्याचा स्वतंत्र निर्यात कक्ष स्थापन करून त्यांच्याकडे जबाबदारी दिली होती. कृषी विभागातील अधिकाऱ्यांना माध्यमांसाठी लिहण्याची सवय त्यांच्यामुळे लागली असं बोललं जातं.

फळबाग लागवडीतून आणि निर्यातीतून मिळणाल्या विदेशी चलनाचा टक्का त्यांच्यामुळे वाढला असं म्हणायला हरकत नाही. निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी कामात वाहून घेतले आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्या भरीव कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जाण्याने कृषी क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

Web Title: Govind Hande State Agricultural Export Adviser passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.